Narendra Modi Appeal : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाची भाजप मंत्र्यांकडून खिल्ली! गिरीश महाजनांची हवाबाजी, आशिष शेलारांकडून थट्टा?

Girish Mahajan Ashish Shelar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याची टीका करण्यात येत आहे. त्यांनी केलेला खासगी विमान प्रवासामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.
Prime Minister Narendra Modi’s fuel saving appeal receives support from BJP leaders Girish Mahajan and Ashish Shelar.
Prime Minister Narendra Modi’s fuel saving appeal receives support from BJP leaders Girish Mahajan and Ashish Shelar.Sarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News: पश्चिम आशियातील तणावामुळे जगावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन करत सार्वजनिक वाहतूक, मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनावश्यक परदेशी दौरे टाळण्यास सांगितले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर त्याला प्रतिसाद देखील मिळतो आहे. मात्र, मंत्री आशिष शेलार यांचा एका व्हिडिओ चर्चेचा ठरला आहे. तर, मंत्री गिरीश महाजन यांच्या हवाई यात्रेवर देखील टीका केली जात आहे.

सुषमा अंधारे यांनी एका व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये मंत्री शेलार हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याशी मस्करीत बोलताना दिसत आहे की, 'एकेदिवशी आम्हाला सांगाल चालत या आणि सिक्युरीटीला देखील खांद्यावर घेऊन या.'

शेलारांच्या याच वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये आशिष शेलार यांनी मोदींचीच टिंगल उडवली आहे, असा दावा केला आहे.

मंत्री गिरीश महाजन हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह एका खासगी समारंभासाठी विमानाने पोहोचले होते. त्यावरून देखील सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मोदींच्या आवाहनाला त्यांचे मंत्री प्रतिसाद देत नसल्याचे टीकेत म्हटले जात आहे.

Prime Minister Narendra Modi’s fuel saving appeal receives support from BJP leaders Girish Mahajan and Ashish Shelar.
Ramdas Athawale : पंतप्रधान मोदींचा काटकसरीचा मंत्र, आठवलेंचा ताफा कार्यकर्त्यांच्या वाहनांनी 'फुल ऑन'; शिर्डीतून ‘बजाओ ताली’ म्हणत, विरोधकांना डिवचलं!

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि पेट्रोलजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याच्या परकीय चलन गंगाजळीवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पार्श्वभूमीवर काटकसरीचे आवाहन केले होते. विमान प्रवास टाळावा आणि इंधनाचा वापर कमी करावा यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी बुलेटवर प्रवास करीत मंत्रालय गाठले होते. अन्य मंत्री तसे प्रयोग करून प्रसिद्धीत आले आहेत. मात्र, गिरीश महाजन यांचा हवाईदौऱ्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.

Prime Minister Narendra Modi’s fuel saving appeal receives support from BJP leaders Girish Mahajan and Ashish Shelar.
Minister's Convoy: सामान्यांना दिलासा मिळणार? महाराष्ट्रात मंत्र्यांच्या ताफ्यांवर निर्बंधांचे संकेत; मोदींच्या आवाहनाचा परिणाम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com