Kisan Sabha News : बळीराजासाठी पी. साईनाथ यांच्यासह 'हे' मान्यवर उतरणार रस्त्यावर; मोर्चात होणार सहभागी

P. Sainath in Kisan Sabha Long March : अखिल भारतीय किसान सभेचा हा मोर्चा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे.
Kisan Sabha News, P. Sainath
Kisan Sabha News, P. Sainath Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar : शेतकरी, शेतमजूर, महिला, ग्रामीण श्रमिककेंद्री यांच्या मूलभूत हक्कांसाठी किसान सभा पुन्हा आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या २६ ते २८ एप्रिलच्या अकोले ते लोणी या पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.

हा मोर्चा राज्याचे महसूल व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. यात अनेक मान्यवरांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात कृषी संकटामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांमुळे शेतकरी आत्महत्या वाढत असून शेतकऱ्यांना शेती सोडावी लागत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळेच ही आपत्ती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांचा त्याग करून शेतकरी, शेतमजूर, महिला, ग्रामीण श्रमिककेंद्री कृषी धोरणांचा स्वीकारण्याच्या उद्देशाने हा मोर्चा काढण्यात येत आहे. आता या मोर्चाविषयी मोठी माहिती समोर आली आहे.

Kisan Sabha News, P. Sainath
Uday Samant On Barsu Refinery: रिफायनरी आंदोलनास्थळी पत्रकारांना पोलिसांची अरेरावी; मंत्री सामंत म्हणतात...

या मोर्चात रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जागतिक कीर्तीचे पत्रकार पी. साईनाथ, ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. आर. रामकुमार, उत्तर भारतातील लोकप्रिय शेतकरी नेते व लेखक बादल सरोज, माकपचे तरुण व लढाऊ आमदार विनोद निकोले आदी मान्यवर अकोले ते लोणी पायी मोर्चात सहभागी होणार आहेत. पी. साईनाथ आणि यातील बहुसंख्य मान्यवर मोर्चात तीनही दिवस सहभागी होऊन शेतकऱ्यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.  

Kisan Sabha News, P. Sainath
Satish Chaturvedi News : महाविकास आघाडीत पूर्व नागपूर शिवसेनेला मिळाला तर ज्युनिअर, नाहीतर सिनिअर चर्तुर्वेदी ?

अखिल भारतीय किसान सभेने(Kisan Sabha) आयोजित केलेला हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल व दुग्धविकास मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय, अखिल गुरव समाज संघटना व विविध समविचारी संघटनांनी या मोर्चास सक्रिय पाठिंबा दिला आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून आंदोलन तीव्र केले जाणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com