Ahilyanagar Gangster Firing News : अहिल्यानगरमध्ये थरार! कुख्यात मोहोळकरवर लागोपाठ सहा गोळ्या झाडल्या; नीलेश घायवळला कानशिलात मारल्याचं प्रकरण पुन्हा चर्चेत

The notorious Jamkhed gangster who allegedly assaulted Pune gangster Nilesh Ghaywal was fired upon by two unidentified bike-borne attackers : अहिल्यानगरच्या जामखेडमधील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे.
Ahilyanagar Gangster Firing News
Ahilyanagar Gangster Firing News Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar crime update : अहिल्यानगर जामखेड गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे. कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळी झाडण्यात आल्या आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकापाठोपाठ सहा गोळ्या झाडल्या. ही घटना रात्री आठ वाजता जामखेड इथल्या नुराणी काॅलनी इथं घडली.

या घटनेनंतर जामखेड शहरासह अहिल्यानगर , पुणे, सोलापूर अन् बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सागर मोहोळकर हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हल्ल्यात त्याला पाच गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

सागर मोहोळकर हा जामखेड (Jamkhed) शहरातील नुराणी काॅलनी परिसरातून चालला होता. त्यावेळी त्याच्यासमोरून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी (Crime) सागर मोहोळकर याच्यावर सहा गोळ्या झाडल्या असून, त्यातील पाच गोळ्या त्याला लागल्या आहेत.

सागर मोहोळकर याला तोंडा दोन, डोळ्याला एक आणि छातीवर दोन अशा गोळ्या लागल्या असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजली. पोलिसांनी (Police) प्राथमिक नोंद घेत, जामखेडसह अहिल्यानगर, पुणे, सोलापूर अन् बीड जिल्ह्यात हल्लेखोरांना शोधण्यासाठी अलर्ट केलं आहे.

Ahilyanagar Gangster Firing News
Akshay Kardile And Prajakt Tanpure : अक्षय कर्डिलेंची उमेदवारी फायनल? प्राजक्त तनपुरेंचं कधी ठरणार?

गोळीबाराच्या घटनेनंतर काही वेळातच तिथं स्थानिकांनी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने सागर मोहोळकर याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सागर मोहोळकर याची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारीची आहे.

Ahilyanagar Gangster Firing News
Baramati And Rahuri by election : विखेंकडून राहुरी–बारामती पोटनिवडणुकीची तारीख जाहीर; ‘मविआ’,‘महायुती’समोर टाकली मोठी अट

घायवळच्या कानशि‍लात लगवल्याची घटना चर्चेत

सागर मोहोळकर हा पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ आला कानशि‍लात लगावल्यानंतर चर्चेत आला होता. धाराशिव इथल्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या यात्रेत गेल्यावर्षी 11 एप्रिल 2025मध्ये मोहोळकर याने घायवळ याच्या कानशि‍लात लगावली होती. यानंतर सागर मोहोळकर याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी अधिकच चर्चेत आली.

मोहोळकर याच्या गुन्हेगारीचा भयंकर इतिहास

सागर मोहोळकरचा गुन्हेगारीचा इतिहास भयंकर आहे. तो कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्रातील पक्का खिलाडी आहे. त्यावर खुनाचे दोन गुन्हे दाखल आहे. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना, सागरने तुरुंगात देखील आणखी एकाचा खून होता, अशी माहिती मिळते. यातून त्याचे गुन्हेगारी निगडीत असलेले अनेक किस्से आहेत. एखाद्या जुन्या वादातूनच सागरवर हा हल्ला झाल्याचे पोलिसांकडून समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com