Uddhav Thackeray : भाजपा मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, "ती व्यक्ती द्वेषानं भरलेले, जनतेला..."

Radhakrishna Vikhe Patil On Uddhav Thackeray : "बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांनी कधीच गमावला आहे. त्यांच्याकडं..."
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातून उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. आता उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर मंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी टीका केली आहे. "उद्धव ठाकरे कोकणातील जनतेला काहीच देऊ शकत नाहीत. ते व्यक्ती द्वेषाने भरलेले आहेत. खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) रोज सकाळी उठून बोलतात, तोच वारसा उद्धव ठाकरेंनी चालवला आहे," असं टीकास्र विखेंनी सोडलं.

Uddhav Thackeray
Ganpat Gaikwad Firing : पोलिसांनी गोळीबार प्रकरणाची माहिती विधानभवनाला दिली; कारवाई होणार ?

मंत्री विखे यांनी राहाता येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "उद्धव ठाकरेंकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. कोकण दौरा करून ठाकरे जनतेला काहीच देऊ शकत नाहीत. सत्ता गेल्यानं ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. ती व्यक्ती द्वेषाने ग्रासलेले आहेत. ठाकरेंची भाषणे ऐकण्यास कुणी येत नाहीत. राज्यातील त्यांचे दौरे फक्त नौटंकीसाठी चालले आहेत," असा हल्लाबोल विखेंनी केला आहे.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

"बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांनी कधीच गमावला आहे. त्यांच्याकडे पक्ष, आमदार आणि कार्यकर्ते देखील शिल्लक नाहीत," असा टोला विखेंनी लगावला आहे.

Uddhav Thackeray
Ganpat Gaikwad Firing : ज्या वादातून महेश गायकवाडांवर हल्ला, ते तक्रारदारच समोर; केली 'ही' मोठी मागणी

"इंडिया आघाडीकडे नेतृत्व करणारा नेता शिल्लक नाही. त्यामुळे एक-एक पक्ष बाहेर पडत आहेत. जनतेनं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीनं काहीही केलं, तरी ते मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखू शकत नाहीत. नरेंद्र मोदी विश्वास जनक नेतृत्व आहेत. जनतेनं त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला आहे," असं विखे पाटलांनी म्हटलं.

Edited By : Akshay Sabale

Uddhav Thackeray
Ajit Pawar on Poonam Pandey Death : पूनम पांडेचा मृत्यू; अजितदादांकडून सभेत उल्लेख अन्‌ उपमुख्यमंत्र्यांवर ओढावली नामुष्की!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com