Nashik Kumbh Mela : जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह अन् कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांमध्ये काय वाजलं? सकाळी बसने सोबत प्रवास, दुपारी नाराजीचे फटाके

Rajendra Singh, Girish Mahajan : राजकारण्यांची काही मजबुरी असते असा टोला राजेंद्र सिंह यांनी गिरीश महाजन यांना लगावला. त्यांनी अवघ्या तीनच मिनिटांत आपले भाषण आटोपले.
Rajendra Singh, Girish Mahajan
Rajendra Singh, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela News : दीर्घ कालावधीनंतर नाशिकमध्ये आलेले जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल सकाळी खंबाळे पार्किंग ते त्र्यंबकेश्वर बसने सोबत प्रवास केला. त्र्यंबकेश्वर येथील गंगा गोदावरी द्वार परिसर, मेटघर ग्रामपंचायत, ब्रम्हगिरी पर्वत येथे सोबतच वृक्षारोपण केलं. पण दुपारी हेच चित्र पूर्णपणे फिरलं..

दुपारुन दोघांच्या उपस्थितीत पंचवटीमध्ये उन्नत नाशिक अभियानातंर्गत पर्यावरणसमृद्ध नाशिक व हरित कुंभाच्या दिशेने लोकसहभाग’या विषयावर विशेष सभा होणार होती. मात्र, या कार्यक्रमाला मंत्री महाजन हे आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचे निमित्त सांगून मुंबईला निघून गेले. महापालिका आयुक्त मनीषा खत्रीही उद्घाटन सोहळ्यानंतर निघून गेल्या.

महापौर हिमगौरी आहेर सोडल्या तर नाशिकचे आमदार किंवा कुंभमेळा आयुक्त यातील कुणीही या कार्यक्रमाला नव्हते. राजेंद्र सिंह यांचे भाषण सुरु असताना इतरही काही उपस्थितांनी सभागृह सोडल्याने डॉ. सिंह नाराज झाले. या नाराजीतून त्यांनी अवघ्या तीन मिनिटांत आपले मनोगत आटोपले. त्यामुळे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन व जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह या दोघांमध्ये नेमकं काय वाजलं हा चर्चेचा विषय बनला आहे.

कुंभमेळा म्हटलं की नाराजी नाट्य आलंच! विशेषत: प्रशासन व साधू-महंत यांच्यातील नाराजी कॉमन असते. मात्र, आता नाशिक कुंभनगरीत कुंभमेळ्याच्या आधीच नाराजीचे फटाके फुटू लागले असून आता सामाजिक तसेच पर्यावरण वादी कार्यकर्त्यांमध्येही नाराजी नाशिककरांना बघायला मिळत आहे.

Rajendra Singh, Girish Mahajan
Girish Mahajan ST Bus: गिरीश महाजनांनी ताफा सोडला, थेट एसटी पकडली; त्र्यंबकेश्वरच्या गर्दीत पालकमंत्र्यांचा ‘साधा’ प्रवास चर्चेत

नेमकं काय घडलं?

पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे काल नाशिकमध्ये होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला अन् मंत्री महाजन सर्व कामे सोडून तत्काळ मुंबईला निघून गेले. त्यामुळे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह नाराज झाले. व्यासपीठावरुनच नाराजी व्यक्त करत अवघ्या तीन मिनिटात त्यांनी आपले भाषण आवरते घेतले अन् कार्यक्रम संपवला.

नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर स्वच्छ, सुंदर, प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी उन्नत नाशिक अभियान राबविले जात आहे. या अभियानातंर्गत पंचवटीतील कै. सदाशिव भोरे नाट्यगृहात सोमवारी (दि. २४) ‘पर्यावरणसमृद्ध नाशिक व हरित कुंभाच्या दिशेने लोकसहभाग’ या विषयावर विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Rajendra Singh, Girish Mahajan
Nashik Guardian Minister : मोठी बातमी, नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनांची नियुक्ती; राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा, भुजबळ-भुसेंना डच्चू

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र सिंह उपस्थितीत होते. मात्र, त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमुळे महाराष्ट्र नदी पुनरूज्जीवन अभियानाची होऊ न शकलेली घोषणा आणि सभागृहात शिक्षकांची अल्प उपस्थिती यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी बोलावल्याने मंत्री गिरीश महाजन सर्व कामे सोडून मुंबईला निघून गेले. आजच्या कार्यक्रमाचे नियोजन, घोषणा ते विसरून गेले, अशी खंत डॉ. सिंह यांनी व्यक्त केली. ‘राजकारण्यांची काही मजबुरी असते,’ असा टोला त्यांनी लगावला. जेव्हा वरिष्ठ नेता आठवण काढतो, तेव्हा ते थांबू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आठवण काढली, त्यामुळे सर्व कामे सोडून ते मुंबईला निघून गेले. अशी नाराजी व्यक्त करत त्यांनी अवघ्या तीनच मिनिटात आपले भाषण संपवले.

याशिवाय सकाळपासूनच उपस्थित असलेल्या विविध शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनीही उशिरापर्यंत चाललेल्या कार्यक्रमामुळे काढता पाय घेतला. कार्यक्रमास नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके उपस्थित होत्या. तर भाजपचे आमदार, अनेक नगरसेवकही अनुपस्थित होते. महापालिका आयुक्त मनीषा खत्रीही उद्घाटन सोहळ्यानंतर निघून गेल्या. हे सगळं पाहाता डॉ. सिंह नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.

Rajendra Singh, Girish Mahajan
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदी निवड होताच गिरीश महाजन म्हणाले : ‘मला आज पांडुरंग पावला...’

सकाळी बोलणं झालं...

डॉ. सिंह म्हणाले आपण सकाळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत होतो. मागे या सरकारने ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम सुरू केला होता. त्या उपक्रमाला आता 7 वर्ष झाली. सुमारे 108 नद्यांबद्दल अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी एक अहवाल तयार केला. जवळपास 108 नद्यांचा अहवाल तयार आहे. नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याच्या दुसऱ्या टप्प्याची गरज मांडली. हे सर्व ऐकल्यानंतर मंत्री महाजन यांनी महाराष्ट्र नदी पुनरुज्जीवन अभियान सुरू करण्याचे मान्य केले होते.

डॉ. सिंह यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ज्या नद्यांचे रूपांतर आता नाल्यांमध्ये झाले आहे, त्यांना पुन्हा नदीचे स्वरूप देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. एखाद्या राज्यातील किंवा देशातील नदी नाला बनली, तर त्या प्रदेशाची संस्कृती आणि सभ्यता हळूहळू नष्ट होण्यास सुरुवात होते. मात्र, याच नाल्यांना पुन्हा नदीचे स्वरूप प्राप्त करून दिल्यास तेथील संस्कृती आणि सभ्यतेलाही पुन्हा नवसंजीवनी मिळते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com