Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या राज्यसभेसाठी मोहटा देवीला साकडे...

Rajya Sabha Election Pankaja Munde News : पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांची देवीकडे धाव...
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics News :

राज्यसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहत आहे. आज दुपारनंतर निवडणुकीच्या रिंगणात कोण-कोण याचे चित्र स्पष्ट होईल. गेल्या काही वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळणार, असे काहीसे चित्र आता भाजपकडून निर्माण करण्यात आले आहे.

उमेदवारी मिळणार आणि निवडून येणार या कल्पनेनेच मुंडे यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. श्री क्षेत्र मोहटा देवीला पाथर्डीतील ओबीसी नेते दिलीप खेडकर यांनी Pankaja Munde यांच्या उमेदवारीसाठी साकडे घातले आहे.

Pankaja Munde
OBC Vs Maratha : 'ओबीसीं'कडून 'सगेसोयरे'वर तब्बल 60 हजारांवर हरकती...

ओबीसी नेते दिलीप खेडकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळून त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून याव्यात. तसेच पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी जलक्रांती अभियाना अंतर्गत पाटपाणी आणण्याच्या चळवळीला यश प्राप्त व्हावे, यासाठी देखील श्री क्षेत्र मोहटा देवीला साकडे घातले आहे. या दोन्हींची संकल्प पूर्तीनंतर मोहटा देवीला चांदीचा मुकुट अर्पण करणार असल्याचे तसेच पंकजा मुंडे खासदार झाल्यानंतर त्यांची पाथर्डी तालुक्यातून जंगी मिरवणूक काढून पेढे तुला करणार असल्याची माहिती खेडकर यांनी दिली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष खेडोपाडी पोहोचवला. तसेच पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रसारासाठी मोठा संघर्ष केला. मात्र पक्ष सत्तेत आल्यानंतर मुंडे साहेबांचे अपघाती निधन झाले. यामुळे ओबीसी समाजाच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ओबीसीसह बहुजन नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्यातूनच त्याची शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील जनतेशी विशेष नाळ जोडली गेली. जनतेच्या मनात मुंडे कुटुंबावर विशेष प्रेम असल्याचे राजकीय व सामाजिक पटलावर अधोरेखित झालेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपची राज्यात आणि देशात सत्ता असूनही पक्षाकडून पंकजा मुंडे यांना राजकीय पटलावर योग्य संधी मिळालेली नाही. त्यांचा राजकीय वनवास सुरूच आहे. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचे चित्र आहे. राजकीय पटलावर पंकजा मुंडे यांची भूमिका भाजप स्पष्ट करत नाही. मात्र राज्यसभेसाठी भाजपने पंकजा मुंडे यांना संधी द्यावी, अशी मागणी ओबीसींकडून होत आहे.

अजिनाथ आंधळे महाराज, भाजप जिल्हा उपाध्यक्ष माणिक खेडकर, परिवर्तन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मनोरमा खेडकर, भाजप तालुका अध्यक्ष मृत्युंजय गर्जे, तालुका उपाध्यक्ष अमोल गर्जे, शहराध्यक्ष अजय भंडारी यावेळी मोहटा देवी मंदिरात साकडे घालताना उपस्थित होते.

edited by sachin fulpagare

Pankaja Munde
Uddhav Thackeray : 'काय रे बाबा जागेवर आहेस ना ?' उद्धव ठाकरेंचा आमदार तनपुरेंना मिश्किल टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com