Raksha Khadse News : 'गिरीशभाऊ अन् नाथाभाऊ एकत्र आले, तर...' ; रक्षा खडसेंचं वक्तव्य चर्चेत!

BJP and Eknath Khadse News : लोकसभा निवडणुकीपासून एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश रखडलेला आहे. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा राष्ट्रवादीत जावून उत्साहाने काम करेन, असा भाजपला इशारा दिलेला आहे.
Raksha Khadse on Eknath Khadse and Girish Mahajan
Sarakarnama
Published on
Updated on

Raksha Khadse on Eknath Khadse and Girish Mahajan : केंद्रीय राज्यमंत्री आणि एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजना यांनी एकत्र यावं, अशी माझी आजही इच्छा आहे. असं वक्तव्यं केलं आहे. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश अद्याप रखडलेला आहे. आपण काही दिवस वाट पाहणार, अन्यथा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा सक्रीय होणार, असा इशारा खडसे यांनी भाजपला दिलेला आहे. त्यानंतर आता रक्षा खडसे यांचे हे वक्तव्य समोर आलं आहे.

खासदार रक्षा खडसे(Raksha Khadse) यांनी म्हटले की, 'लोकसभा निवडणुकीच्यावेळी पुढाकार घेवून, नाथाभाऊंना नक्कीच मला मदत केलेली आहे. यात कुठेच शंका नाही. केंद्राच्या नेत्यांकडूनही पण त्यांना सांगण्यात आलं होतं, त्यांनी त्या पद्धतीने सहकार्य सुद्धा केलेलं आहे. '

तसेच 'पण बाकीचा जो विषय आहे, नक्कीच तो वरिष्ठांचा विषय आहे. मी एवढी मोठी नाही की, या दोघांच्यामध्ये मी येवून काहीतरी बोलू शकते. दोघंजण बसून यासंदर्भात काय करायचं, काय नाही करायचं याचा निर्णय घेतील. आजही ती इच्छा आहेच की, गिरीशभाऊ आणि नाथाभाऊ एकत्र आले, तर जिल्ह्याच्या विकासात भर पडले.'

Raksha Khadse on Eknath Khadse and Girish Mahajan
Raksha Khadse : 36 चा आकडा असलेले नाथाभाऊ अन् गिरीश महाजन एकत्र येणार? रक्षा खडसेंचा नेमका प्लॅन काय?

तर भाजपमध्ये प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी, 'भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा स्वरुपाची विनंती मी भाजपला केली होती. परंतु भाजपकडून अद्याप प्रवेशावर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे. पण काही दिवस आणखी भाजपची वाट पाहीन. अन्यथा माझा मूळ पक्ष राष्ट्रवादी आहे, तो जॉईन करून पुन्हा राष्ट्रवादीत उत्साहाने काम करेन.' असा इशारा भाजपला दिला आहे.

Raksha Khadse on Eknath Khadse and Girish Mahajan
Eknath Khadse News : एकनाथ खडसे 'या' कारणामुळे जाणार नाहीत जळगावमधील पीएम मोदींच्या कार्यक्रमास

लोकसभा निवडणुकीपासून भाजपसोबत(BJP) असलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश गेल्या काही दिवसापासून रखडलेला आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा भाजप प्रवेश होणार की नाही? याची उत्सुकता लागलेली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com