दीपक पांडे माफी मागा... आक्रमक महसूल संघटनेचा इशारा !

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या विरोधात आंदोलनावर महसूल अधिकारी आक्रमक झाले.
Revenue Officer given memorandum to Commissioner.
Revenue Officer given memorandum to Commissioner.Sarkarnama

नाशिक : पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांच्या महसूल विभागाचे (Revenue) अधिकारी `आरडीएक्स` तर भुमाफीया `डिटोनेटर` या विधानाने महसूल विरूद्ध श्री. पांडे यांच्यातील वादाचा स्फोट झाला आहे. याबाबत बिनशर्त माफी (Apologies) मागावी अन्यथा येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंद करून तीव्र आंदोलनाचा (Agitation) इशारा महसूल अधिकारी संघटनेने आज दिला.

Revenue Officer given memorandum to Commissioner.
कादवा साखर कारखान्याचे बॅास श्रीराम शेटेच, विरोधकांना भोपळा!

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी शासनाला दिलेले पत्र येत्या ५ दिवसांत मागे घ्यावे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बिनतर्फे माफी मागावी. अन्यथा ११एप्रिलपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी संघटनेने दिला आहे. त्यासाठी विभागातील ४२ अधिकाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविण्यात आले आहे.

Revenue Officer given memorandum to Commissioner.
आयुक्त पवार म्हणाले, आग आणि पाण्याशी खेळायचे नसते!

आज या निवेदनाची प्रत विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्यात आली. त्यामुळे नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे आणि महसूल विभागातील संघर्ष तीव्र झाला आहे.

या मागणीसाठी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी श्री. पांडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

महसूल अधिकारी हे आरडीएक्स तर दंडाधिकारी हे डिटोनेटर असून त्यांचे सर्व अधिकारी काढून घ्यावे असे पत्र नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांना पाठविले होते. हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होताच महसूल विभागात एकच खळबळ उडाली. यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील आपली नाराजी व्यक्त करत याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर श्री. पांडे यांनी महसूलमंत्री थोरात यांच्याकडे माफी मागत आपण दुखावले असल्यास दिलगिरी व्यक्त केली. मात्र मी माझ्यावर मतांवर ठाम असल्याचा देखील पुनरूच्चार केला.

आज विभागातील सर्व महसूल अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी यांनी पोलीस आयुक्तांविरुद्ध एकत्र येत विभागीय आयुक्तांची भेट घेतली. पोलिस आयुक्त पांडे यांच्यावर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.

यावेळी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याबरोबर चर्चा केली. पोलीस आयुक्तांच्या पत्रामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे. महसूल व पोलिस हे दोन्ही शासनाचे विभाग आहेत. त्यांची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आपले कार्यक्षेत्र सांभाळावे. महसूल अधिकाऱ्यांना विधीमंडळाने अधिकार प्रदान केले आहे. त्यात बदल करण्याचा अधिकार हा विधीमंडळाला आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी बिनशर्त माफी मागावी.

श्री. गमे यांनी देखील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत पोलिस आयुक्तांचे कार्यक्षेत्र वेगळे आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात या संदर्भात तीव्र स्वरुपाच्या तक्रारी उपस्थित केल्या होत्या. त्यावेळीही उपमुख्यमंत्री यांनी पोलीसांनी काय कामे करावीत व काय करु नयेत याची आम्हाला चांगली जाणीव आहे. आपण याबाबत आम्हाला शिकवू नये असे सुनावले होते. तसेच या प्रकरणात उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आदींच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त स्तरावर याबाबत संबंधितांची बैठक घेतली. त्याला पोलिस आयुक्त आदींची कर्तव्य, जबाबदाऱ्यांबाबत जाणीव करुन देण्यात आलेली होती.

आज महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त रमेश काळे, सहाय्यक आयुक्त कुंदन सोनवणे, जिंतेद्र इंगळे, शशिकांत मंगरूळे, अनिल पुरे, अणोल पुरे, अमोल निकम, परमेश्वर कोठुळे, एम. एच. आहिरे, संजय साळी, रमेश डोईफोडे आदी ४२ अधिकाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com