Rohini Khadse : रोहिणी खडसेंच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटोच नाही ; राष्ट्रवादीचं चिन्ह अन् नावही नाही.. स्वतःच दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या...

Rohini Khadse Banner, Sharad Pawar photo : आमदार एकनाथ खडसे वयाची ७४ वर्षे पूर्ण करून २ सप्टेंबरला ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करीत आहेत, त्यानिमित्ताने आज अमृतमहोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
Rohini Khadse
Rohini KhadseSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : ज्येष्ठ नेते आमदार तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन आज रविवारी (दि. ३०) कोथळी, मुक्ताईनगर येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यास केंद्र व राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार सकाळी जळगावात दाखल झाले आहेत.

वयाची ७४ वर्षे पूर्ण करून खडसे २ सप्टेंबरला ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करीत आहेत, त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा आज ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुक्ताईनगरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली असून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. भाजपसह विविध पक्षाचे राज्यातील तसेच केंद्रातील मोठ-मोठे नेते या सोहळ्याला उपस्थितीत राहणार आहेत.

एकीकडे एकनाथ खडसे यांचे फोटो त्यांच्या स्नुषा तथा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांनी पक्षाच्या प्रोटोकॉलसह लावले आहेत. तर त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष व खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र पक्षाचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख न करता शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत.

Rohini Khadse
Eknath Khadse : खडसेंच्या अमृत महोत्सवाला शरद पवारांचा दौरा निश्चित ; आता लक्ष फक्त CM फडणवीसांकडे, अवघे काही तास बाकी!

एकनाथ खडसे हे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषद आमदार आहेत. तसेच रोहिणी खडसे या देखील पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. तरीही त्यांनी लावलेल्या बॅनरवरून पक्षाचे नाव, चिन्ह तसेच शरद पवारांचा फोटो गायब असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान बॅनरवर पक्षाचे चिन्ह आणि शरद पवारांचा फोटो नसल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता, त्यावर रोहिणी खडसे यांनी खुलासा केला आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या, " हा काही पक्षाचा कार्यक्रम नाही. हा आमचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. इथे सर्वपक्षीय नेते उपस्थितीत राहणार आहेत. हा पक्षाव्यतिरिक्त आयोजित करण्यात आलेला कौटुंबिक कार्यक्रम असल्याने इथे पक्षाचे चिन्ह, नाव किंवा पक्षाचा प्रोटोकॉल कुठेही नाही. त्यामुळे आम्ही पक्ष विरहित फ्लेक्स लावले आहेत.

Rohini Khadse
Sharad Pawar NCP: मोठी बातमी: शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर, आव्हाडांसह कुणाला मिळाली संधी?

एकनाथ खडसे अनेक वर्ष भाजपचे नेतृत्व करत होते, त्यांचे पक्षासाठीचे योगदान कुणीही नाकारु शकत नाही. त्यांच्यावर प्रेम करणारे भाजपमध्ये कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावले आहेत," असेही रोहिणी खडसे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com