Eknath Khadse : खडसेंच्या अमृत महोत्सवाला शरद पवारांचा दौरा निश्चित ; आता लक्ष फक्त CM फडणवीसांकडे, अवघे काही तास बाकी!

Eknath Khadse and Devendra Fadnavis : आमदार एकनाथ खडसे यांचा अमृतमहोत्सवी सोहळा उद्या रविवारी होणार आहे. सोहळ्याला अवघे काही तास बाकी आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह काही नेत्यांचे दौरे निश्चित झाले आहे.
Eknath Khadse Amrit Mahotsav invitation
Eknath Khadse Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse Amrit Mahotsav : जळगावचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांचा अमृतमहोत्सवी सोहळा उद्या रविवार (दि. ३०) कोथळी, मुक्ताईनगर येथे होणार आहे.

मुक्ताईनगर येथे होणाऱ्या या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी केंद्र व राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यासाठी खडसेंनी सर्वपक्षीय नेत्यांना तसेच आपल्या कट्टर राजकीय विरोधकांना देखील निमंत्रण दिलं आहे.

त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यातील मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राज्यपाल हरिभाऊ बागडे आदी नेत्यांचे दौरे प्राप्त झाले आहेत.

या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी समीतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष उपस्थिती म्हणून निमंत्रित केले आहे. स्वतः खडसेंनीही फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या सोहळ्याला येतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Eknath Khadse Amrit Mahotsav invitation
Eknath Khadse : खडसेंच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांसह चार कट्टर विरोधकांचे फोटो, अमृत महोत्सवातून राजकीय कमबॅकचा ट्रेलर?

खडसेंनी आपल्या अमृत महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांना शरद पवार यांच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची फोटोसह विशेष उपस्थिती दर्शविण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे दोघे ऐकेकाळी भाजपमध्ये होते. परंतु २०१६ मध्ये एका प्रकरणात एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर खडसे-फडणवीस यांच्यातील संबंध पूर्णपणे बिघडले. राजकीय विरोधक म्हणून खडसेंनी फडणवीसांवर अनेकदा टोकाची टीका केली. फडणवीसांनीही त्यांना अनेकदा प्रत्युत्तर दिलं.

मात्र, आता खडसेंनी मैत्रीचा हात पुढे केला आहे त्याला फडणवीस कसा प्रतिसाद देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला फडणवीस उपस्थित राहिले, तर हा केवळ एका ज्येष्ठ नेत्याचा सन्मान न राहता दोन्ही नेत्यांमधील बदलत्या संबंधांचा राजकीय संदेश म्हणूनही त्याकडे पाहिले जाऊ शकते.

Eknath Khadse Amrit Mahotsav invitation
Eknath Khadse : महाजनांच्या घराची बेल वाजली... अखेर एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाचं निमंत्रण पोहचलं ; 'कार्यक्रमाला या' म्हणत हात जोडून आग्रह

चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या....

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक दिवस आधीच शनिवार (दि. २९) खडसेंची जळगावात भेट घेऊन त्यांना अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शुभेछा दिल्या आहेत. पुण्यात पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात रविवारी दुसरा कार्यक्रम असल्याने, त्यांना खडसे यांच्या अमृत महोत्सवास उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे त्यांनी शनिवारीच मुक्ताईनगर गाठत खडसे यांना शुभेच्या दिल्या.

महाजनांसह कट्टर विरोधकांनाही आमंत्रण

खडसेंचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री सुरेश जैन, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनाही खडसेंच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे निमंत्रण पोहचले आहे. त्यामुळे यांच्यापैकी कोण कोण खडसेंच्या वाढदिवसाला येणार कोण येणं टाळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com