Nagar Loksabha : रोहित पवारांचा सुजय विखेंना मित्रत्वाचा सल्ला, 'अर्ज मागे घ्या...'

Rohit Pawar : पारनेरच्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नीलेश साहेबराव लंके (रा. कामोठा, जिल्हा. रायगड) यांच्या नावाचा समावेश करून लोकसभा निवडणुकीत त्यांचा उमेदवारी अर्ज भरून विखे पाटील डमी राजकारणाचा खेळ खेळत आहेत, राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) आरोप
Rohit Pawar Sujay Vikhe-Patil
Rohit Pawar Sujay Vikhe-Patil sarkarnama

Nagar Political News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध नीलेश लंके सामना होतो आहे. लंके यांचे पारडे जड वाटत आहे म्हणून सुजय विखे पाटील हे डमी उमेदवार देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस NCP शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला होता. याचे पुरावेदेखील आपल्याकडे असल्याचे सांगत नीलेश लंके यांच्या नावाशी साधर्म्य असणारा उमेदवार देत डमी राजकारणाचा खेळ विखे खेळत असल्याचा आरोप फाळके यांनी केला होता. आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनीदेखील सुजय विखे यांना अर्ज मागे घेण्याचा सल्ला दिला आहे.

Rohit Pawar Sujay Vikhe-Patil
Election 2024 : विखेंकडून डमी उमेदवार, डाव उलटवण्याचे पुरावे आमच्याकडे; राजेंद्र फाळके गरजले

'माझे मित्र डॉ. सुजय विखे-पाटील Sujay Vikhe-Patil यांना विजयासाठी डमी उमेदवाराचा आधार घ्यावा लागतो, यावरूनच नगरच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झालाय. आता पराभूत होण्याची नामुष्की पत्करण्यापेक्षा अर्ज माघारी घेतला तर सन्मान तरी राहील, असा मित्र म्हणून माझा डॉ. सुजय विखे-पाटील यांना सल्ला आहे,' असे ट्विट रोहित पवार Rohit Pawar यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पारनेरच्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नीलेश साहेबराव लंके (रा. कामोठा, जिल्हा. रायगड) यांच्या नावाचा समावेश करून लोकसभा निवडणुकीत त्यांचा उमेदवारी अर्ज भरून विखे पाटील डमी राजकारणाचा खेळ खेळत आहेत. गेली 50 वर्षे त्यांनी हेच केले. आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत नीलेश ज्ञानदेव लंके यांनी विखे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. यातून विखे परिवार पुरता हादरला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला आहे.

रायगड, मावळमध्येही डमी उमेदवार

रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आनंत गिते यांच्यात लढत आहे. मात्र, या दोन्ही उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असणार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर, मावळमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या संजय वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com