

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळल्यावर अस्वस्थ झालेले नाशिक जिल्ह्यातील त्यांचे कट्टर समर्थक सुदाम बोडके वय (63) यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. काल आमदार रोहित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या ढकांबे या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी आमदार पवार म्हणाले, अजित दादांची बातमी आपण ऐकली, बातमी खरी आहे का स्वप्न आहे तेच कळत नाही. हा काळ शोक आणि आत्मचिंतनाचा आहे. त्यामुळे 13 दिवस राजकारणावर कोणतेही भाष्य करणार नाही. अजितदादांचं तेरावं होईपर्यंत म्हणजे 9 तारखेपर्यंत मी कुठलीही राजकीय चर्चा करणार नाही. अजित दादांच्या तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मी राजकीय विषयावर भाष्य करेन सर्व प्रश्नांना सविस्तर आणि स्पष्ट उत्तरे दिली जातील असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी केला आहे. यासंदर्भात दादांसोबत झालेल्या चर्चेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आला आहे. तसेच 12 तारखेला याबाबत निर्णय घेतला जाणार होता हे स्वत: शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरुन राजकीय वादळ उठले आहे.
मात्र, याबाबतीत 9 तारखेला पत्रकारपरिषद घेऊन दादांबरोबर नेमकी काय चर्चा झाली, संपूर्ण प्रक्रियेत काय घडले, याबाबतचे सर्व तपशील दिले जातील असं रोहित पवारांनी सांगितलं. सगळ्या प्रक्रियेत मी होतो, मात्र तेरा दिवसांनी याबाबतचे सर्व तपशील मांडले जातील असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला पवार कुटुंब अनुपस्थित होते. त्यासंदर्भात रोहित पवार म्हणाले, की शपथविधी होणार आहे, याची आम्हाला पूर्वकल्पना नव्हती. त्यासंदर्भात टीव्हीवरूनच बातम्यांच्या माध्यमातून समजले. त्यावेळी लाखो लोक बारामतीत सांत्वनासाठी येत होते. सध्या हा काळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा नाही. दुःख व्यक्त करण्याचा आणि संयम राखण्याचा आहे असे सांगत तेरा दिवस पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील असं रोहित पवार म्हणाले.
त्यामुळे आता आमदार रोहित पवार ९ फेब्रुवारीनंतर एक विशेष पत्रकार परिषद घेणार असून, यामध्ये विलिनीकरणाच्या चर्चेचे थेट पुरावे सादर केले जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.