Ashok Chavan : नांदेडचे राजकारण तापलं! बावनुकळेंच्या एका वक्तव्याने अशोक चव्हाणांचे वजन कमी केलं; महापौर पक्ष ठरवणार

mayor Politics In Nanded Corporation : नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपने 81 पैकी तब्बल 45 जागा जिंकत पहिल्यांदा सत्ता ताब्यात घेतली आहे. पण हे काम काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले आहे.

  • भाजपचे 45 नगरसेवक निवडून आणत नांदेडमध्ये आजही आपले राजकीय वर्चस्व असल्याचे चव्हाण यांनी दाखवून दिले.

  • मात्र नांदेडचा महापौर कोण ठरवणार याबाबत अशोक चव्हाण यांचे अधिकार मर्यादित राहणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Nanded Mayor News : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड महापालिकेत पहिल्यादांच पक्षाचे कमळ फुले आहे. भाजपचे 45 नगरसेवक निवडून आणत चव्हाण यांनी नांदेडमध्ये आजही आपलाच आवाज चालतो हे दाखवून दिले. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी भाजपला कधी नांदेड महापालिकेत डोके वर काढू दिले नव्हते. एकहाती सत्ता राखत अशोक चव्हाण यांनी कायम आपले वर्चस्व राखले. आता त्याच भाजपसाठी अशोक चव्हाण राबले आणि त्यांनीच इथे कमळ फुलवण्यात सिंहाचा वाटा उचलला. यानंतर आता नांदेडचा महापौर कोण? हे तेच ठरवणार अशी चर्चा होती. मात्र महापौर निवडण्याचे अधिकार त्यांच्याकडे राहणार नाहीत, असे संकेत मिळत असून याची जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजपाचे नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनुकळे यांनीच याबाबत नांदेड दौऱ्यात भाष्य केले. नांदेडचा महापौर पक्षाची कोअर कमिटी ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर कोण होणार याचा निर्णय नांदेडमध्ये नाही, तर राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीमध्ये होणार, असे सांगत त्यांनी पक्षातील निष्ठावंतांना दिलासा दिला.

नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपने 81 पैकी तब्बल 45 जागा जिंकत बहुमतासह सत्ता काबीज केली. या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पक्षाने खासदार अशोक चव्हाण यांच्यावर सोपवली होती. स्वबळावर लढत भाजपाने इथे शतप्रतिशत कमळ फुलवले. महापौर, उपमहापौर निवडीसाठी 10 फेब्रुवारी रोजी महापालिकेची विशेष सभा पार पडणार आहे. महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले असल्याने यावर कोणाची वर्णी लागते, याबद्दल मोठी उत्सूकता आहे.

Ashok Chavan
Ashok Chavan News : नांदेड-वाघाळा महापालिकेत कमळ फुलले, पण अशोक चव्हाणांच्या अंगणातच काँग्रेस उमेदवाराने मारली बाजी!

अशोक चव्हाण सांगतील तोच नांदेडचा महापौर होईल, असा दावा केला जात असला तरी चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपची कोअर कमिटीच याबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट सांगीतले. अशोक चव्हाण भाजपामध्ये आल्यापासून नांदेड जिल्ह्यात दोन गट पडल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण समर्थक विरुद्ध भाजपातील मुळ निष्ठावंतांचा दुसरा गट असे चित्र पहायला मिळते. नगरपालिका निवडणुकीत भाजपाला काही तालुक्यात यश मिळाले असले तरी त्यावर सामान्य पदाधिकारी, कार्यकर्ते समाधानी नाहीत.

महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी निष्ठावंतांऐवजी आपल्या समर्थकांनाच उमेदवारी दिल्याची चर्चाही पक्षातील एका गटाकडून केली गेली. आता महापौर पद देखील चव्हाण समर्थक महिला नगरसेवकालाच मिळणार असल्याने काहीसे नाराजीचे वातावरण आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरी नांदेडचा महापौर राज्याची कोअर कमिटी ठरवणार असे सांगीतले असले, तरी ही कमिटी अशोक चव्हाण यांनी शिफारस केलेले नाव डावलू शकेल का? हा खरा प्रश्न आहे.

'ही' नावे आहेत स्पर्धेत

महापौर पदावर नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या स्पर्धेत कविता मुळे, ज्योती कल्याणकर, वैशाली देशमुख, अनुराधा काळे, शांभवी साले, सुदर्शना खोमणे आदीची नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत.

Ashok Chavan
Ashok Chavan News : मी इथेच जन्मलो, इथेच मरणार; अशोक चव्हाण नांदेडमुक्त होऊच शकत नाही!

FAQs :

1. नांदेड महापालिकेत भाजपला किती जागा मिळाल्या?
भाजपला एकूण 45 नगरसेवक निवडून आले आहेत.

2. भाजपने नांदेड महापालिका कधी पहिल्यांदा जिंकली?
अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच भाजपला यश मिळाले आहे.

3. अशोक चव्हाण यांची या विजयात काय भूमिका होती?
त्यांनी प्रचार आणि राजकीय रणनीतीत प्रमुख भूमिका बजावली.

4. नांदेडचा महापौर कोण ठरवणार?
महापौर निवडीचे अधिकार चव्हाण यांच्याकडे राहणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत.

5. काँग्रेससाठी हा निकाल काय दर्शवतो?
नांदेडमधील काँग्रेसचा बालेकिल्ला कोसळल्याचे चित्र या निकालातून दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com