Sanjay Raut : संजय राऊत जाब विचारायला पोहोचण्याआधीच प्रांताधिकारी गायब, नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हायहोल्टेज ड्रामा

Sanjay Raut On Pawan datta : कार्यालयात येण्यापूर्वी राऊत यांनी प्रातांधिकारी पवन दत्ता यांच्यासोबत फोनवर संवाद साधला होता. त्यानंतर राऊत थेट त्यांच्या कार्यालयात दाखल झाले पण त्यापूर्वीच प्रांताधिकारी तेथून गायब झाले होते.
Sanjay Raut reaches Nashik Collector office over administrative issue
Sanjay Raut reaches Nashik Collector office over administrative issueSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित असलेल्या नाशिकमधील रिंग रोडच्या भूसंपादनासाठी जमिनीची मोजणी करताना मुंगसरे व मातोरी गावच्या महिला शेतकऱ्यांना पोलिस व इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी पवन दत्ता व इतर अधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातही (दि. ७ मे) या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणात उडी घेतली. संजय राऊत हे पीडित शेतकरी व महिला तसेच शिवसैनिकांना घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले.

संजय राऊत कार्यालयात दाखल होण्यापूर्वीच प्रांताधिकारी पवन दत्ता हे त्यांच्या कार्यालयातून निघून गेले होते. तर जिल्हाधिकारी देखील उपस्थितीत नसल्याने राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच जवळपास अर्धा तास ठाण मांडले.

खासदार राऊत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे खरीप आढावा बैठकीसाठी रवाना झाले होते. त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी शिष्टमंडळाची भेट घेत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, "जिल्हाधिकारी बोलावतात असे सांगून प्रांताधिकारी पवन दत्ता पळून गेले आहेत, त्यांना आधी समोर आणा," अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी आणि राऊत यांनी यावेळी घेतली.

Sanjay Raut reaches Nashik Collector office over administrative issue
Sanjay Raut : संजय राऊतांनी 'त्या' महिलांसमोरच प्रांताधिकाऱ्यांना फोन करून विचारला जाब, तुम्हाला अधिकार कोणी दिला?

कुंभमेळ्याच्या प्रस्तावित रिंग रोडच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोपाचा जाब विचारण्यासाठी संजय राऊत हे खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गिते, तसेच शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. या सगळ्यांनी तिथेच कार्यालयात ठिय्या मांडला.

यावेळी राऊत पत्रकारांशी याविषयावर बोलले. म्हणाले, मी कधीही सरकारी कार्यालयात जात नाही, पण मारहाण झालेल्या आजींचा हात बघून मी इथे आलो. सगळ्या महिलांकडे बघा, त्यांना कसं मारलय ते पाहा. हे आयएएस अधिकारी व पोलिसांचे काम नाही. तुम्ही हातात दांडे घेऊन महिलांवर हात उचलतात तेही महाराष्ट्रामध्ये. तुम्ही महिलांच्या सुरक्षिततेचा विषय करतात ना? मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यासाठी खास भेटणार आहे. पंतप्रधानांकडे देखील मी तक्रार करणार असल्याचं राऊत म्हणाले.

Sanjay Raut reaches Nashik Collector office over administrative issue
Nashik Ring Road : महिला व शेतकऱ्यांना मारहाण, प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या अडचणी वाढणार ; मंत्री महाजन स्वत: करणार कारवाईची मागणी

हे प्रकरण अत्यंत गंभीर असून सीता समान माता-भगिनींना घरात घुसून मारहाण केली जाते. कसले अधिकारी नेमले आहेत तुम्ही? जबरदस्तीने जमिनी घेऊ नका. मी पोलीस किंवा ईडीला घाबरत नाही. याला धमकी समजायची असेल तर खुशाल समजा असा इशारा राऊत यांनी सरकारला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com