Satyajeet Tambe Latest News : 'सरकारनामा'ची बातमी खरी ठरली; सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज : भाजप पाठिंबा देणार?

Satyajeet Tambe News : सरकारनामाने हे वृत्त सर्वात आधी दिले होते.
Satyajeet Tambe Latest News
Satyajeet Tambe Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik Graduate Constituency Election News : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस (Congress) नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. या संदर्भातील वृत्त बुधवारी प्रकाशीत केले होते. त्यामध्ये सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवार असतील असे म्हटले होते. त्यानंतर आज (ता. १२) तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला.

काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याची घोषणा केली आहे. नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघातील कॉंग्रेस उमेदवाराबाबत अर्ज भरण्यापर्यंत गुपीत कायम राहिले होते. कॉंग्रेसचे सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीची ऑफर असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे ते भाजपचे उमेदवार असतील काय? याबाबत चर्चा सुरू होती.

Satyajeet Tambe Latest News
Graduate Constituency Election : पक्षाने सांगितलं तर सत्यजीत तांबेंना पाठिंबा देऊ : विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

त्यातच कॉंग्रेसतर्फे सुधीर तांबे यांची अधिकृत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी जाहिर केली. त्यामुळे ते कॉंगेसचे उमेदवार असतील असे जाहिर झाले. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुधीर तांबे व सत्यजीत तांबे सोबत गेले. मात्र डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. सत्यजीत तांबे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यात एक कॉंग्रेसतर्फे तर एक अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या नावाचा पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचे सागंण्यात सांगण्यात आले आहे.

Satyajeet Tambe Latest News
Satyajeet Tambe Latest NewsSarkarnama

आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे सत्यजीत तांबे यांनी घोषित केले. तांत्रीक कारणामुळे आपला पक्षाचा एबी फॉर्म आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाठींब्यासाठी आपण भाजपसह सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत आपल्याला भाजपच्या (BJP) कोणत्याही नेत्यांची भेट झाली नाही. मात्र, आता आपण राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांनी आपल्याला पाठींबा द्यावा असे सांगणार आहोत. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Satyajeet Tambe Latest News
Nashik Legislative Council Elections : नाशिक पदवीधरचा सस्पेन्स संपला; सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवार

भारतीय जनता पक्षातर्फे मात्र अद्यापही अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे सत्यजीच तांबे महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी ते अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे आता पुन्हा भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. भाजप त्यांना पाठींबा देणार काय? हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, नगरमधील एका मोठ्या राजकीय घराण्यातील तरूण नेता अपक्ष अर्ज भरणार असून त्या अपक्ष उमेदवाराला भाजपा-शिंदे गट पाठिंबा देऊ शकतो, असे सर्वात आधी वृत्त सरकारनामाने दिले होते. त्यामुळे ते वृत्त खरे ठरले आहे. भाजचा अधिकृत उमेदवार नसल्यामुळे ते तांबे यांना पाठिंबा देऊ शकतात. तांबे यांनीही बोलताना सांगितले की फडणवीस यांचे माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे आता महविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गट मिळून तांबे विजयी होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com