

Nashik Mahavikas Front News : प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मधील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज एक पाऊल पुढे टाकले. त्यांनी धरणे आंदोलन करीत मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा व्यक्त केला. (Rahul Dive deemands BJP shall think positively in Maratha reservation Issue)
नाशिक शहरात (Nashik) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नगरसेवक राहुल दिवे आणि प्रशांत दिवे यांच्या पुढाकाराने धरणे आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनाला (Maratha reservation) पाठिंबा देण्यात आला.
शहरातील उपनगर भागात सकाळी जमलेल्या कार्यकर्ते आणि पादधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. त्यात मराठा समाजाने आरक्षणासाठी गेली काही वर्षे अत्यंत शांततेत आंदोलने केली. मोर्चे काढले. त्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शासनाने आरक्षणदेखील दिले होते. मात्र, भाजपच्या छुप्या यंत्रणेने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन ते रद्द केले. ही सर्व मंडळी कोणाचे साथीदार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.
मराठा आरक्षणाबाबत सध्याच्या राज्य सरकारने घेतलेली भूमिका खेदजनक वाटते. समाजातील एक गरजू आणि गरीब घटक आरक्षण मागतो आहे. मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहे. त्यांना दिलेले तीस दिवसांचे आश्वासन सरकारने का पाळले नाही?, याबाबत समाजात अस्वस्थता आहे. त्यामुळे आम्ही पाठिंबा देत असल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल दिवे यांनी या वेळी सांगितले.
जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यात महाविकास आघाडीचे काँग्रेस, शिवसेना तसेच दलित आणि आदिवासी समाजाचे कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.