Anna Hazare Send Notice To Awhad : जितेंद्र आव्हाडांना अण्णा हजारेंवरील टीका भोवणार ? कायदेशीर नोटीस बजावली

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना अण्णा हजारे यांच्यावरील टीका भोवण्याची चिन्हे
Anna Hazare and Jitendra Awhad
Anna Hazare and Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत सडकून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अण्णा हजारे यांनी आव्हाडांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. यानंतर आता हजारे यांनी आव्हाडांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आव्हाडांना अण्णा हजारे यांच्यावरील टीका भोवण्याची चिन्हे असून, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा एक फोटो एक्सवर (ट्विटर) शेअर करत जोरदार टीका केली होती. "या माणसाने देशाचे वाटोळे केले, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही", अशी खोचक टीका आव्हाडांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अण्णा हजारे यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता.

Anna Hazare and Jitendra Awhad
Anna Hazare On Awhad : आमदार जितेंद्र आव्हाडांना 'ते' ट्विट भोवणार; अण्णा हजारे अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

तसेच प्रतिक्रिया देताना "माझ्यामुळे देशातील नागरिकांचे भले झाले. माझ्या आंदोलनामुळे चांगले कायदे मिळाले. माझ्या आंदोलनामुळे अनेकांना घरीदेखील बसावे लागले", असे हजारे म्हणाले होते. यावर पुन्हा आव्हाडांनी "किमान माझ्या पोस्टमुळे हजारे यांना जाग आली", असा खोचक टोला लगावला होता.

दरम्यान, या प्रकरणी आता अण्णा हजारे यांनी आव्हाडांना नोटीस पाठवली असून, आव्हाडांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी आणि अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. अण्णा हजारे यांनी आपल्या वकिलामार्फत आव्हाडांना बदनामी केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. यावर आता जितेंद्र आव्हाड काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अण्णा हजारेंची आव्हाडांसह पवारांनाही नोटीस ?

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेनंतर अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही नोटीस पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच याबाबत जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांनी खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आव्हाडांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या नोटीसमार्फत दिला आहे.

Edited by Ganesh Thombare

Anna Hazare and Jitendra Awhad
Nana Patole On Dhangekar : काँग्रेसच्या बॅनरवर धंगेकरांचे फोटो का नाहीत? नाना पटोले म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com