FDA Notice : शाहरुख-अजय-टायगरला पानमसाला जाहिरातीप्रकरणी नोटीस; भाजप आमदार पाचपुतेंचा कारवाईसाठी वर्षभर पाठपुरावा

Bollywood Stars Face FDA Notice Over Surrogate Advertising : इलायची-सौफच्या जाहिरातींतून पानमसाला ब्रँडच्या अप्रत्यक्ष प्रमोशनचा मुद्दा; FDA ने 15 दिवसांत खुलासा मागितला.
FDA notice to Shah Rukh Khan Ajay Devgn Tiger Shroff
FDA notice over pan masala advertisementSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra FDA action : पानमसाल्याचे अप्रत्यक्षपणे प्रमोशन केल्याप्रकरणी, बॉलिवूड स्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्राॅफ यांना पुढील 15 दिवसांत खुलासा करण्याची नोटीस अन्न व प्रशासनाने बजावली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बजावली या नोटिशीचे समर्थन करत, या प्रकरणात विधानसभेत सातत्याने पाठपुरावा केल्याने यश येताना दिसत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली.

इलायची, सौफ अथवा तत्सम उत्पादनांच्या नावाखाली जाहिराती करून प्रत्यक्षात फ्लेवर्ड सुपारी, तंबाखू, पान मसाला अन् गुटख्यासारख्या उत्पादनांच्या ब्रँडचा अप्रत्यक्ष प्रचार करणाऱ्या जाहिरातींबाबत आपण चार जुलै 2025 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या अभिनेते व सेलिब्रिटींवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपण सरकारकडे केली होती, याकडे भाजपचे (BJP) आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्ष वेधले.

बाॅलिवूडमधील अभिनेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारणे दाखवा नोटीस बजावल्याने, या मागणीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यश आले आहे. ही कारवाई केवळ एखाद्या जाहिरातीपुरती मर्यादित बाब नसून सार्वजनिक आरोग्य आणि विशेषतः युवा पिढीच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे, असे विक्रम पाचुपते यांनी म्हटले आहे.

FDA notice to Shah Rukh Khan Ajay Devgn Tiger Shroff
Ahilyanagar District Bank Election : राम शिंदे-गडाख भेटीनंतर विखे पितापुत्र ‘विरंगुळा’वर; जिल्हा बँकेसाठी नवे समीकरण?

एका बाजूला तंबाखू, गुटखा व आरोग्यास घातक उत्पादनांवर निर्बंध असताना, त्याच ब्रँडच्या नावाने इलायची, सौफ किंवा अन्य उत्पादनांची जाहिरात करून ब्रँडला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जाते. लोकप्रिय अभिनेते आणि सेलिब्रिटींचा चेहरा वापरल्यामुळे अशा ब्रँडबाबत समाजात, विशेषतः युवकांमध्ये, आकर्षण आणि स्वीकारार्हता निर्माण होण्याचा धोका असतो.

FDA notice to Shah Rukh Khan Ajay Devgn Tiger Shroff
Dheerajsinh Rajput Murder Case : धीरजसिंह हत्या प्रकरणात संग्राम जगतापांचा पोलिसांवर गंभीर आरोप; SITवर मंत्री विखे काय म्हणाले?

अभिनेत्यांना सामाजिक जबाबदारी पळ काढता येणार नाही

“जाहिरात इलायचीची किंवा सौफची असली, तरी त्यामागे जर तंबाखू, पान मसाला किंवा गुटख्याच्या ब्रँडची प्रसिद्धी होत असेल, तर केवळ उत्पादनाचे नाव बदलून सामाजिक जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. मोठ्या सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा प्रभाव लाखो युवकांवर पडतो. त्यामुळे अशा जाहिराती स्वीकारताना त्यांचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका आपण विधानसभेत मांडली होती,” याकडे विक्रम पाचपुतेंनी लक्ष वेधले.

मुंढेंच्या कारवाईचे पाचपुतेंकडून स्वागत

या विषयावर परिणाम दिसण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला; मात्र सातत्याने केलेला पाठपुरावा अखेर फलदायी ठरला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे.

कारणे दाखवा नोटीस ही कारवाईची सुरुवात आहे. पुढील प्रक्रियेत कायद्याच्या तरतुदींनुसार योग्य ती ठोस कारवाई होणे आणि अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रभावी आळा बसणे आवश्यक आहे, असेही पाचपुते यांनी म्हटले.

जनहितासाठी अंतिम परिणामापर्यंत लढणार

विधानसभेत प्रश्न मांडणे ही केवळ सुरूवात असते. त्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून प्रत्यक्ष निर्णय आणि कारवाईपर्यंत नेणे महत्त्वाचे असते. चार जुलै 2025 रोजी मांडलेल्या मागणीवर आज कारवाई सुरू झाली, याचे समाधान आहे. एक वर्ष लागले, पण पाठपुराव्याला यश आले. जनहिताचा विषय असेल तर तो अंतिम परिणाम मिळेपर्यंत सोडायचा नाही, हीच आपली भूमिका असेल, असे पाचपुते यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com