Nilesh Lanke Attacks Vikhe Patil : माझ्या कामांचं उद्घाटन कशाला? नीलेश लंके यांचा मंत्री विखेंवर हल्लाबोल, ‘चोरट्यासारखं भूमिपूजन करू नका’

NCP Sharad Pawar faction MP Nilesh Lanke accuses Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil taking credit for development projects Parner taluka, intensifying political tensions Ahilyanagar : पारनेर दौऱ्यावरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके यांनी जहरी टीका केली आहे.
Nilesh Lanke Attacks Vikhe Patil
Nilesh Lanke Attacks Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar politics : अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके यांनी भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विकासकामांच्या श्रेयावरून जोरदार टीका केली आहे.

पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि पाहणी दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी थेट निशाणा साधत राजकीय वातावरण ढवळून काढले.

पारनेर (Parner) तालुक्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार लंके म्हणाले, “आमच्या जिल्ह्याचे आदर्श पालकमंत्री पारनेर दौऱ्यावर आले आहेत. मात्र स्वतःची कामं मंजूर करा आणि मग त्याचं उद्घाटन करा. नीलेश लंके यांनी मंजूर केलेल्या कामांचे उद्घाटन करण्याची गरज काय?”

पुढे बोलताना त्यांनी पळशी इथल्या आश्रमशाळेचा मुद्दा उपस्थित केला. “पळशी इथं सात कोटी रुपयांची आश्रमशाळा मंजूर करून उभी केली. त्या कामाचं उद्घाटन पालकमंत्र्यांनी (Radhakrishna Vikhe Patil) केलं. स्वतःच्या झेंड्यावर पंढरपूर करायला शिकलं पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला.

Nilesh Lanke Attacks Vikhe Patil
Nilesh Lanke On Sujay Vikhe : लंकेंनी खेचली दुखती नस! ‘18 गुन्हे अन् उद्घाटन’ किस्स्याने विखेंभोवती खळबळ

या वेळी लंके यांनी पारनेर बसस्थानक आणि न्यायालयाच्या इमारतीचाही उल्लेख केला. “पारनेरचं बसस्थानक आणि कोर्टाची इमारत मी मंजूर करून आणली. मात्र आता त्या कामांची पाहणी पालकमंत्री करत आहेत,” असेही ते म्हणाले.

Nilesh Lanke Attacks Vikhe Patil
Private Coaching Classes Ban : नीट पेपरफुटीनंतर मंत्री विखेंचा ‘शिक्षण बॉम्ब’; खासगी क्लासेसवाल्यांना झटका, प्रत्येक कॉलेजमध्ये NEET क्लासेसची मागणी!

टीकेची धार अधिक तीव्र करत खासदार लंके म्हणाले, “मी दुसऱ्याच्या कामांची पाहणीसुद्धा करत नाही. दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामांवर जाण्याची माझी पद्धत नाही. आमदार झाल्यापासून मी कधीही खोटं उद्घाटन केलेलं नाही. मी स्वतःच्या झेंड्यावर छातीठोकपणे पंढरपूरला जातो; दुसऱ्याच्या कामाचं चोरट्यासारखं भूमिपूजन करत नाही.”

पालकमंत्री विखे पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “तुमच्या राजकीय कारकिर्दीत नेमकं काय विकासकाम केलं, हे जनतेसमोर मांडा. फक्त राजकारण आणि जिरवा-जिरवी करण्यात वेळ गेला; मात्र ठोस विकासकामं झाली नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.

याचवेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांवर अपेक्षित चर्चा झाली नाही. ज्याला जे करायचं ते करू द्या. पारनेर तालुका स्वाभिमानी आहे आणि तो तसाच स्वाभिमानी राहिला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, विकासकामांच्या श्रेयावरून सुरू झालेला हा वाद आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पारनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये या आरोप-प्रत्यारोपांमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com