Sharad Pawar Politics: पदाधिकाऱ्यांना शरद पवार कोणता कानमंत्र देणार? उत्सुकता शिगेला

NCP Political News: विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राज्यातील पदाधिकाऱ्यांकडून शरद पवार आढावा घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

NCP News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसला. या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीमधील अनेक पराभूत उमेदवारांनी न्यायालयात तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडक पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत पाचारण केले आहे. गुरुवारी दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ही बैठक होणार आहे. यावेळी निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात येणार आहे.

Sharad Pawar
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच्या अडचणीत भर; खंडणी प्रकरणी आता 'या' साथीदाराचे घेतले व्हॉईस सॅम्पल्स

बुधवारी दिवसभर पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून विविध पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून याबाबतचा निरोप देण्यात येत होता. त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि उमेदवारी हुकलेल्या इच्छुकांनी मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील राजकीय माहिती संकलित केली आहे. अनेकांनी या संदर्भात प्रदेश स्तरावरून झालेली उमेदवारांची निवड चुकली याबाबत थेट प्रदेशाध्यक्ष यांचा हस्तक्षेप कारणीभूत ठरल्याचे प्रतिक्रिया मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Sharad Pawar
Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

गुरुवारी होणाऱ्या आढावा बैठकीला विशेष महत्त्व दिले जात आहे. पक्षीय स्तरावर विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा मतदारसंघनिहाय आढावा यापूर्वीच घेण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी पदाधिकाऱ्यांची सल्लामसलत करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा राजकीय कानमंत्र देण्याची शक्यता आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारांना प्रचार साहित्य पुरविण्यात उणीवा राहिल्याच्या तक्रारी आहेत. त्या दृष्टीने अनेक पदाधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी तयारी केली आहे.

Sharad Pawar
Patangrao Kadam : 'रयत'मध्ये अर्धवेळ शिक्षक ते भारती विद्यापीठाचे संस्थापक, असा होता पतंगराव कदमांचा संघर्ष

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संघटनात्मक आणि अन्य सर्वच राजकीय कार्यक्रम थंडावल्याची स्थिती आहे. याउलट महायुतीच्या घटक पक्षांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. भाजपने मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे अनेक पदाधिकारी फोडण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय स्तरावरील राजकारणाच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपलं पक्ष बळकट करण्याची आवश्यकता भासत आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेतो, हा देखील उत्सुकतेचा विषय आहे.

Sharad Pawar
MVA Politics : विधानसभेच्या निवडणुका बेकायदेशीर; शरद पवारांच्या पक्षाचा दावा, विक्रमी याचिका दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com