Sharad Pawar News : शरद पवार नगरमध्ये मोठा डाव टाकणार; खासदार विखेंविरोधात 'हा' तगडा उमेदवार देणार ?

MP Sujay Vikhe Patil Vs NCP : उद्धव ठाकरेंसह शरद पवारांचाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर डोळा आहे.
Sharad Pawar-Sujay Vikhe Patil
Sharad Pawar-Sujay Vikhe Patil Sarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे -

Ahmednagar Political News : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. याचदरम्यान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपविरुद्ध महाविकास आघाडीकडून कोण? याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

भाजप पुन्हा एकदा खासदार सुजय विखे पाटलांना(Sujay Vikhe Patil) संधी देणार असल्याचे जवळपास निश्चित आहे, पण खासदार विखेंविरोधात महाविकास आघाडी कोणाला उतरवणार याचा सस्पेन्स अद्याप तरी कायम आहे. अशातच विखेंविरोधात कर्जत - जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रोहित पवार यांचं नाव पुढं आलं आहे.

Sharad Pawar-Sujay Vikhe Patil
Sharad Pawar Vs Ajit Pawar : 'अजित पवार मुख्यमंत्री होतील, पण...'; शरद पवारांचा चिमटा !

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत नगरमध्ये सुजय विखे पाटीलविरुद्ध रोहित पवार (Rohit Pawar) अशी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत रोहित पवारांच्या लोकसभेच्या उमेदवारीची चर्चा झडू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवारांचे नाव सुचवल्याची माहिती समोर येत आहे.

शरद पवारांचा आजही नगरच्या दक्षिण मतदारसंघासाठी आग्रह आहे. महाविकास आघाडीकडून कोण याची चर्चा सध्या सुरू आहे. एकीकडे भाजप खासदार सुजय विखे पाटलांविरोधातील उमेदवारासाठी महाविकास आघाडीकडून सध्या चाचपणी सुरू आहे. शरद पवार यांचे नगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघावर पहिल्यापासून लक्ष आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्याचा शरद पवारांचा प्रयत्न राहिला आहे. पवार यांना 2004च्या लोकसभेला तुकाराम गडाख यांच्या रूपात या मतदारसंघात यश मिळाले होते. त्यानंतर 2009, 2014, 2019 असे तीन वेळा पवारांच्या पदरी निराशा आली.

आमदार लंकेंचा लोकसभेसाठी जोर, पण...

अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार नीलेश लंकेंनी लोकसभेसाठी जोर लावला होता, पण राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर त्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटासोबत जाणे पसंत केले. राष्ट्रवादी एकसंघ असताना आमदार नीलेश लंके यांचे नाव चर्चेत होते. तसे आमदार लंकेंनीदेखील दक्षिण मतदारसंघात दौरेदेखील वाढवले होते.

पण आता ते अजित पवार गटात असून, भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून कोणता चेहरा असेल, याची चाचपणी सुरू आहे. यात आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आमदार रोहित पवार यांचे नाव पुढे केले जात आहे. काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावर शरद पवार यांच्याशीदेखील चर्चा केली आहे.

Sharad Pawar-Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe-Patil News : खासदार विखेंनी राष्ट्रवादीच्या जगतापांना ऑफर देताना साधले योग्य टायमिंग

ठाकरे गटाकडून माजी मंत्री शंकरराव गडाख...?

शिवसेना आणि राष्ट्रवादीत गट पडले आहेत. देशात इंडिया आघाडी आहे, तर राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे चेहरे आहेत. शरद पवारांचा आजही नगरच्या दक्षिण मतदारसंघासाठी आग्रह आहे. महाविकास आघाडीकडून कोण याची चर्चा सध्या सुरू आहेत. ठाकरे गटाकडून माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचे नाव मध्यंतरी चर्चेत होते.

रोहित यांचे सर्वच पक्षात चांगले संबंध...

आमदार रोहित पवार सध्या राज्यासह देशातील विविध मुद्द्यांवर परखड भाष्य करत आहेत. राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. ते सातत्याने राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार गटाबरोबर असलेल्या जुन्या-जाणत्या नेत्यांनादेखील अंगावर घेतले आहे. मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्यातील वाद हा राज्यात गाजला होता. आमदार रोहित पवार यांचे सर्वच पक्षात चांगले संबंध आहेत.

Sharad Pawar-Sujay Vikhe Patil
Supriya Sule News : " दादा, तू मुख्यमंत्री हो; पण गृहमंत्रिपद 'त्यांना' देऊ नकोस..."; खासदार सुळेंचा अजितदादांना मोठा सल्ला

याशिवाय त्यांची भाजपचे खासदार सुजय विखेंबरोबरदेखील मैत्री आहे. खासदार विखेंसारखाच आमदार पवार यांची नगर जिल्ह्यातील युवक मतदारांमध्ये क्रेझ आहे. राजकारणासह प्रशासनावरदेखील दोघांची पकड चांगली आहे. आमदार पवार विखेंसमोर दिल्यास भाजपला ही लढत सोपी होणार नाही, असे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील पदाधिकारी आणि नेत्यांचे म्हणणे आहे.

शरद पवार(Sharad Pawar) यांचादेखील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर डोळा आहे. हा मतदारसंघ ताब्यात घेण्याची त्यांची प्रबळ इच्छा आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे नगर दक्षिण मतदारसंघाबाबत निर्णय घेणारे असले, तरी काँग्रेसनेदेखील नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक होणार असल्याचे बोलले जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com