Sharad Pawar Vs Ajit Pawar : 'अजित पवार मुख्यमंत्री होतील, पण...'; शरद पवारांचा चिमटा !

Sharad Pawar Vs Ajit Pawar : देशात भाजपविरोधी वातावरण...
Sharad Pawar Vs Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Vs Ajit Pawar : "आमच्यातील काही जणांचा भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. मात्र, देशातील चित्र हे भाजपच्या विरोधात आहे. भाजपची सत्ता नको अशी जनतेला भावना झाली आहे. भाजपसोबत गेलेले अजित पवार यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्नं, हे स्वप्नंच राहील. कारण देशातील चित्र हे भाजपच्या विरोधात आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल," असे म्हणत शरद पवारांनी अजितदादांना टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Nitesh Rane Allegation : नारायण राणेंना जीवे मारण्याचा प्रयत्न; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप !

शरद पवार आज अकोला येथे बोलत होते. पवार म्हणाले, "भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील लढाईत जे सोबत येतील, त्यांना आघाडीत घेऊन पुढे जाणार आहोत. राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष या तीन पक्षांची आघाडी आहे. काही छोटे मोठे पक्ष सोबत येतील. शेतकरी कामगार पक्ष व इतरही काही पक्ष सोबत येत आहेत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Supriya Sule News : फडणवीसांचा पोलिसांवर भरवसा नाय का? कंत्राटी पोलिस नेमण्याचा आदेश कुणाचा खिसा गरम करणार...

वंचितबाबत सकारात्मक

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे भाजपविरोधी इंडिया आघाडीत सहभागी होत असतील, तर त्याबाबत शरद पवारांनी सकारात्मकता दर्शवली आहे. मागील काळापासून प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीतल्या सहभागाबद्दल आशावादी आहेत. याबाबत त्यांनी अनेकदा आपली इच्छा बोलून दाखवली आहे. आता खुद्द शरद पवार यांनीच त्यांच्या सहभागाबद्दल भाष्य केल्याने, आता त्यांच्या इंडिया आघाडीतील स्थानाबाबत मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com