Shirdi Sai Baba Temple Controversy : शिवसेना ठाकरे पक्षाच्या तालुकाप्रमुखांचा राडा; शिर्डीतील साईबाबा प्रसादालयात चपाती उशिरा मिळाल्याने कर्मचाऱ्यांना धमक्या, अखेर गुन्हा दाखल

Shiv Sena UBT leader Bharat More booked after creating ruckus Shirdi Sai Baba temple prasadalaya over delay in serving chapati : शिर्डीतील साईबाबा प्रसादालयात प्रसाद उशिरा मिळाल्यावरून झालेल्या वादाचा व्हिडिओ शूट करून संस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या तालुकाप्रमुखावर करण्यात आला आहे.
Shirdi Sai Baba fake website
Shirdi Sai Baba Sarkarnama
Published on
Updated on

Shirdi Temple Food Controversy : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरगाव तालुकाप्रमुख भरत मोरे हे शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात झालेल्या गोंधळामुळे मोठ्या वादात सापडले आहेत. प्रसादालयात चपाती उशिरा मिळाल्याच्या कारणावरून त्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालत आरडाओरडा केला आणि अखेर त्यांच्याविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील (Shirdi) श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत चालणाऱ्या सशुल्क भोजन हॉल क्रमांक 1 मध्ये पर्यवेक्षक म्हणून जगन्नाथ मुंढे कार्यरत आहेत. याच ठिकाणी भरत मोरे भोजनासाठी आले होते. मात्र चपाती देण्यास काहीसा विलंब झाल्याने मोरे अचानक संतापले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांवर मोठमोठ्याने ओरडत वाद घालण्यास सुरुवात केली.

Shirdi Sai Baba fake website
Maharashtra News Live Update : 'ते नेहमी बैठका ठेवत असतात, पण...' : आमदार निलेश राणे

घटनास्थळी उपस्थित असलेल्या आपल्या एका सहकाऱ्याकडून त्यांनी संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यानंतर मी तुम्हाला काम करू देणार नाही, अशी धमकी देत प्रसाद वाटपाचे काम थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

वाद इथेच थांबला नाही. प्रसादालयातील चपाती आणि पापड खाण्यायोग्य नसल्याचा दावा करत त्यांनी त्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यामुळे संस्थानची प्रतिमा जाणूनबुजून मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Shirdi Sai Baba fake website
Maharashtra News Live Update : घुले खुन प्रकरणात SIT गठीत

या प्रकरणी चुकीची माहिती पसरवणे, संस्थेची बदनामी करणे, कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि कामकाजात अडथळा निर्माण करणे अशा विविध कलमांखाली भरत मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिर्डी पोलिस पुढील तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com