Shirish Chaudhari: भाजप आमदाराचे बनावट लेटरहेड प्रकरण: शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक कधी? राष्ट्रवादी आमदाराचा सवाल

Anil Patil ON Shirish Chaudhari बनावट लेटरहेड प्रकरणात शिरीष चौधरी यांच्या अटकेस होत असलेल्या विलंबावर आमदार अनिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत राजकीय दबावाचा आरोप केला.
Anil Patil ON Shirish Chaudhari  news
Anil Patil ON Shirish Chaudhari newsSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

नंदूरबार : शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याविरोधात बनावट नाममुद्रितपत्र (लेटरहेड) आणि बनावट स्वाक्षरी प्रकरणी दोन दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. पण त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या अटकेस विलंब का होत आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

शिरीष चौधरी यांच्या अटकेत कोणत्याही गृहराज्यमंत्र्यांचा किंवा इतर राजकीय नेत्यांचा दबाव असेल, तर त्याबाबत मुख्यमंत्रीांकडे तक्रार करणार असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले. आवश्यक वाटल्यास आगामी अधिवेशनात गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करू, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित जनसेवा सप्ताहाचा शुभारंभ सोमवारी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय प्रतिस्पर्धी शिरीष चौधरी यांच्यावर जोरदार टीका केली.

काही दिवसांपूर्वी शिरीष चौधरी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांविरोधात भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या नावाचे बनावट नाममुद्रितपत्र आणि बनावट स्वाक्षरी तयार करून सुमारे नऊ कोटी रुपयांचा निधी वळविल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर चौधरी आणि त्यांचे सहकारी फरार आहेत, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

Anil Patil ON Shirish Chaudhari  news
Jalgaon Politics: जळगावच्या राजकारणात दोन सत्ता केंद्र नको! खडसेंच्या भाजप प्रवेशाचा गिरीश महाजन समर्थकांना धसका?

या प्रकरणात नंदुरबार पोलिसांनी गुन्हा दाखल करून योग्य कारवाई केल्याबद्दल आमदार पाटील यांनी पोलिसांचे कौतुक केले. गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात होत असलेल्या विलंबावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Anil Patil ON Shirish Chaudhari  news
Maharashtra Schools: महाराष्ट्रात 9 हजार शाळांमध्ये एकच शिक्षक; यूडायस प्लस अहवालाने उघड केले धक्कादायक वास्तव

यापूर्वीही दरोडा, दंगल आणि मारामारीसारख्या विविध गुन्ह्यांमध्ये शिरीष चौधरी यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळीही राजकीय दबावामुळे त्यांच्या अटकेची कारवाई रखडल्याचा आरोप करण्यात आला होता. आताही त्यांच्या बचावासाठी कोणाच्या माध्यमातून राजकीय दबाव टाकला जात आहे का, असा सवाल आमदार अनिल पाटील यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com