Maratha-OBC Issue : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही तुमचाच; मग भुजबळांना का टार्गेट करता?

Chhagan Bhujbal supporters replyed to Manoj Jarange Patil-भुजबळ समर्थकांनी सोशल मीडियावर दिले मनोज जरांगेंना सडेतोड उत्तर
Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal & Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : मराठा आरक्षणात अडथळा आणल्याचा आरोप करीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना टार्गेट केले आहे. त्याला भुजबळ समर्थकांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे नवा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. (Maratha-OBC reservation issue takes a new political turn on everyday)

मराठा (Maratha Reservation) आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर (Maharashtra) आंदोलन सुरू आहे. त्यात छगन भुजबळ यांना टार्गेट करू नये, अशी अपेक्षा भुजबळ समर्थकांनी सोशल मीडियावर केली आहे.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Congress Nashik News : पटोले आमदार खोसकरांवर बरसले, पण पदाधिकाऱ्यांना का विसरले?

यासंदर्भात भुजबळ समर्थकांनी सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिले आहे. सध्या जरांगे पाटील यांच्या ज्या सभा होत आहेत, त्यात भुजबळ यांच्यावर टीका केली जाते. त्याला अतिशय आव्हानात्मक भाषेत भुजबळ समर्थकांनी उत्तर दिल्याने नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.

याबाबत भुजबळ समर्थक म्हणतात, राज्यात साखर कारखाने, पेट्रोल पंप, शिक्षण संस्था अगदी दवाखानेदेखील तुमचेच आहेत. सगळीकडे वर्चस्व तुमचेच आहे; मग नेमक तुमचं `ओबीसीं`नी काय वाटोळं केलंय?. ज्या पद्धतीने तुम्ही ओबीसी समाज आणि ओबीसी नेत्यांना टार्गेट करता, याचा अर्थ तुम्हाला एक ओबीसी नेता सहन होत नाही, असे दिसते.

त्यात पुढे म्हटले आहे, छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज आणि ओबीसी समाज म्हणजेच भुजबळ साहेब हे समीकरण आहे. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, महापौर, सभापती सगळे तुमचेच आहेत; मग तुम्ही छगन भुजबळ यांना टार्गेट करता, त्यांना टार्गेट करता म्हणजेच ओबीसी समाजाला टार्गेट करीत आहात. हे आता सगळ्यांनी लक्षात घ्यावं. भुजबळ साहेबांना टार्गेट करून तुम्ही ओबीसी समाजाला पांगळं करू पाहत आहात, या शब्दांत भुजबळ समर्थकांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. ‘होय, मी भुजबळ समर्थक’ या ग्रुपवर ही सविस्तर प्रतिक्रिया पोस्ट करण्यात आली आहे.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Supriya Sule News : " दादा, तू मुख्यमंत्री हो; पण गृहमंत्रिपद 'त्यांना' देऊ नकोस..."; खासदार सुळेंचा अजितदादांना मोठा सल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com