Shubhangi Patil News: शुभांगी पाटील यांच्याबाबत शिवसेनेची आज बैठक

महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अद्या पाटील यांच्या नावाची घोषणा झालेली नाही.
Shubhangi Patil
Shubhangi PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

नाशिक : (Nashik) विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार म्हणून शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचे नाव निश्चित झाल्यानंतर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज (ता. १९) नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. (Shivsena meeting in Nashik for Candidate Shubhangi Patil campaign)

Shubhangi Patil
Graduate Constituency Election: काँग्रेसने नागपूरच्या निवडणुकीतून पळ का काढला?

शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई व खासदार विनायक राऊत बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात ही नाशिकमध्ये होणारी पहिली बैठक असेल.

Shubhangi Patil
Shiv Sena News : काम शिवसेनेचे, मेहनत महापालिकेची अन् प्रचाराच्या चिपळ्या भाजपच्या !

विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप चर्चेच्या स्तरावरच आहे. त्यामुळे सहकारी पक्षांत संभ्रमाचे वातावरण आहे. निवडणूक येत्या 30 जानेवारीला आहे. त्यादृष्टीने अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारीचा निर्णय लवकर होण्याची अपेक्षा आहे. अन्यथा त्याचा उमेदवाराच्या प्रचारावर होण्याची भिती व्यक्त होत आहे.

भाजपकडून इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा मिळविला. त्याच्यासंदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. बुधवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पाटील यांच्या नावावर जवळपास काम झाल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी हॉटेल एसएसकेमध्ये शिवसेनेचे नेते सुभाष देसाई व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत विविध संघटनांची बैठक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com