Shivsena Nashik : आरोप झालेल्या नेत्याला आदित्य ठाकरेंचे पाठबळ, मुंबई गाठताच पदोन्नतीचे गिफ्ट !

D.G. Suryawanshi’s Promotion : विरोधकांच्या ट्रॅपला भेदणाऱ्या निष्ठावंत डीजी सूर्यवंशींना ठाकरेंनी दिले पदोन्नतीचे गिफ्ट! शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात पदाधिकाऱ्यांची पुनर्रचना, सूर्यवंशी, गीते, दिंडे यांना नव्या जबाबदाऱ्या!
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : शिवसेना नेते आदित्य ठाकरे गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा एका वादग्रस्त महिलेच्या आरोपांनी गाजला. मात्र मुंबईला पोहोचताच ठाकरेंनी "दूध का दूध आणि पाणी का पाणी" केले.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गेल्या आठवड्यात घेतली. यावेळी आगामी राजकीय पुनर्बांधणीसाठी चाचपणी करण्यात आली. मात्र बैठकीत एका वादग्रस्त महिलेने निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आरोप केल्याने तो दौरा चर्चेचा विषय ठरला.

आरोपाननंतर आदित्य ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांची चर्चा करून प्रश्न समजून घेतले. त्यामुळे निष्ठावंत अशी प्रतिमा असलेल्या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई होते याची धाकधूक होती. मात्र आदित्य ठाकरे यांनी मुंबईला पोहोचताच प्रतिकूल स्थितीत पक्षाला साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पाठबळ दिले.

Aditya Thackeray
MLC Election : जळगावात इच्छुक बसले देव पाण्यात घालून ; गुलाबरावांच्या पुत्राने अर्ज घेतला, भाजपकडूनही तयारी पूर्ण...

शिवसेनेने पदाधिकाऱ्यांची पुनर्रचना केली आहे. यामध्ये निष्ठावंत अशी प्रतिमा असलेल्या डीजी सूर्यवंशी यांना पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख करण्यात आले. महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षांच्या आमिषाला दाद न देता निष्ठेने पक्षात राहिलेल्या प्रथमेश गीते यांनाही महानगर प्रमुख ही जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे या नियुक्त्यांनी निष्ठावंतांना गिफ्ट मिळाल्याचा मेसेज गेला.

नव्या रचनेत केसरीनाथ पाटील हे नाशिकचे सह संपर्कप्रमुख तर सुरेश राणे, सुनील पाटील, राजू पाटील हे सह संपर्कप्रमुख असतील. जयंत दिंडे यांचे दिंडोरी लोकसभा मतदार संघ प्रमुख पद कायम ठेवण्यात आले आहे. निवृत्ती जाधव आणि जगन आगळे हे विधानसभा संघटक तर नगरसेवक केशव पोरजे यांची जिल्हा प्रमुख पदी पदोन्नती झाली आहे.

Aditya Thackeray
MLC Election : नाशिक शिवसेना तर संभाजीनगर, जळगाव दोन्हीकडे भाजप लढण्याची शक्यता.. पाहा संभाव्य यादी

अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये विशाल कदम, राहुल दराडे, कुलदीप आढाव, मयूर परदेशी, मंदार बर्वे, शैलेश सूर्यवंशी, सुभाष गायधनी, सचिन पांडे, नितीन साळुंखे, विजय काळदाते, बंडू दळवी, विलास घोलप आणि अभय अवर्सेकर यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com