Mahayuti News: नाशिकमध्ये राजकारण तापलं; शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजप-राष्ट्रवादी नाराज ?

Shivsena, NCP, BJP : जॉगिंग ट्रॅकच्या भूमिपूजन सोहळ्याला भाजपसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
Nashik Politics
Nashik PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: 'सीएसआर' निधीतून होणाऱ्या जॉगिंग ट्रॅकचा भूमिपूजन सोहळा शिवसेनेचे (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या हस्ते करण्यात आला. भाजपसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. तर, पाटबंधारेच्या मालकीच्या जागेवर अनाधिकृत बांधकाम झाल्यास शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.(Shivsena, NCP, BJP In Nashik Politics)

मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकचा भूमिपूजन सोहळा आज दुपारी पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला फक्त तीदमे आणि त्यांचेच काही कार्यकर्ते हजर होते. या कार्यक्रमाबाबत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अनभिज्ञ होते. तर, महापालिका विकसकाच्या माध्यमातून सदर प्रकल्प उभा करीत आहेत.

त्यात गुपचूप भूमिपूजन सोहळा उरकरण्याचे कारण नव्हते. या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेने सतत दोन वर्ष पाठपुरावा केल्यामुळेच हा प्रकल्प सुरू होतो आहे. पाटबंधारे विभागाची ही जागा असून, त्यावर कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण झालेले खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सत्कार्य फांउडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nashik Politics
Shivsena News : ठरलं तर... नाशिकमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे?

याबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. महापालिकेने योग्य कारवाई न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला. विकास कामांना आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, विकासकामाआड नियमबाह्य अतिक्रमणांला आमचा विरोध राहील, असे गायकवाड म्हणाले. या प्रकाराबाबत बोलताना राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांनी नाराजी व्यक्त केली.

सीएसआर फंडातून होणाऱ्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, भूमिपूजन सोहळ्याबाबत काहीच माहिती दिली गेली नाही. हे वागणे चुकीचे असल्याचे मत महाले यांनी व्यक्त केले. दोन वर्षांपूर्वी खासगी विकसकाच्या मार्फत गोविंदनगर भागात इंडिगो जॉगिंग ट्रॅकचे काम हाती घेण्यास हिरवा महापालिकेने कंदिल दर्शवला होता. मात्र, दोन वर्ष काहीच हालचाल नव्हती.

आता अचानक कामाचे भूमिपूजन करण्यात आल्याने येथील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. शिवसेना पक्ष फुटीवेळी शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असलेल्या सिडको भागातून एकमेव प्रवीण तिदमे हे पक्षातून बाहेर पडले. त्यामुळे ठाकरे गटाकडून तिदमे नेहमीच लक्ष केले जातात. मात्र, स्थानिक पातळीवर महानगर प्रमुख असलेले तिदमे भाजपा आणि राष्ट्रवादीकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Nashik Politics
Lok Sabha Election 2024 : चेनिथला, पटोले अन् माजी मुख्यमंत्री धुळ्यात लोकसभेची रणनीती ठरवणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com