Shinde Fadnavis Govt Fall : शिंदे-फडणवीस-पवार सरकार 72 तासांत कोसळणार; कुणी केला दावा?

Shinde Fadnavis Govt Fall : आमदार अपात्रतेच्या याचिकेच्या सुनावणीत काल विधानसभा अध्यक्षांबाबत कठोर ताशेरे...
devendra fadnvis, eknath shinde, ajit pawar
devendra fadnvis, eknath shinde, ajit pawar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Shivsena News : सातत्याने राज्य सरकारवर प्रहार करणारे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आता नवी भविष्यवाणी केली आहे. राऊत यांच्या मते सर्वोच्च न्यायालयाच्या संदेशाचे गंभीर परिणाम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर होणार आहेत. (SC verdict will badly harm state Government in next three days)

खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्षांवर (Rahul Narvekar) कठोर टिका केली आहे. त्यांनी राज्यातील (Maharashtra) नियमबाह्य सरकार वाचविण्यासाठी कायदादेखील गुंडाळून ठेवल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेच्या सुनावणीत काल विधानसभा अध्यक्षांबाबत कठोर ताशेरे ओढले आहेत. त्याचे राजकीय पडसाददेखील उमटले आहेत. शिवसेनेने याबाबत विधानसभेच्या अध्यक्षांवर टीका केली आहे.

devendra fadnvis, eknath shinde, ajit pawar
MLA Disqualification Case : राऊतांचे भाकीत; म्हणाले, 'अजितदादांसोबतचे आमदारही अपात्र होतील' ; नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला...

याबाबत खासदार राऊत म्हणाले, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पदाला न्याय देत नाहीत, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या टाळक्यात हातोडा मारल्याने त्यांनाच ‘आयसीयू’मध्ये टाकण्याची वेळ आली. मृत्यूशय्येवर असलेल्या राज्य सरकारला विधानसभेच्या अध्यक्षांनी ‘आयसीयू’मध्ये ठेवून जितके वाचवायचे तितके वाचविले, आता पुढील ७२ तासांत हे सरकार कोसळेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.

नाशिक दौऱ्यावर आलेले खासदार राऊत म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत अतिशय गंभीर असल्याचे त्यांच्या निष्कर्षांवरून दिसते. ही राज्यातील सरकारला चपराक आहे."

devendra fadnvis, eknath shinde, ajit pawar
Ahmednagar Politics : नगरमध्ये येणार तेलंगणातील भाजप आमदार; टी. राजासिंहांच्या सभेसाठी परवानगी अर्जच नाही

"विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाला संविधानिक पद्धतीने हाताळणे आवश्यक होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. न्यायालयाने ‘सौ सोनार की और एक लोहार की’ ही म्हण खरी करून दाखविली. येत्या ७२ तासांत सरकार कोसळेल," असा दावा खासदार राऊत यांनी केला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.