Ahmednagar Politics : नगरमध्ये येणार तेलंगणातील भाजप आमदार; टी. राजासिंहांच्या सभेसाठी परवानगी अर्जच नाही

Telangana BJP MLA T.Raja Singh Rally in Nagar : या सभेला परवानगी द्यायची की नाही, याची चाचपणी सुरू
T. Raja Singh
T. Raja SinghSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahmednagar Political News : वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेले तेलंगणामधील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार टी. राजासिंह हे सोमवारी नगरमध्ये येत आहेत. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलच्या प्रांगणात यानिमित्ताने त्यांची सायंकाळी सात वाजता सभा होत आहे.

जिल्हाधिकारी यांचा नगर जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश आहे. त्यामुळे सभेसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची आहे. असे असताना सभेच्या परवानगीसाठी अर्जच नसल्याची माहिती कोतवाली पोलिसांनी दिली. (Latest Political News)

T. Raja Singh
Maratha Vs OBC Reservation : छगन भुजबळांची हकालपट्टी करा; मराठा समाज संतापला, नेमकं काय झालं ?

राजासिंह यांचा व्हिडिओ व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे आणि विश्व हिंदू परिषदेला ६० वर्षांची पूर्तीनिमित्ताने नगरमध्ये शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नगर दक्षिण जिल्ह्यात ही रथयात्रा काढण्यात आली होती. नगर शहरासह नगर तालुका, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, पारनेरमधील गावांतून ही रथयात्रा काढण्यात आली.

यानिमित्ताने नगर शहरात सभा होणार आहे. या सभेत तेलंगणामधील भाजपचे एकमेव आमदार टी. राजासिंह हे सहभागी होणार आहेत. आमदार टी. राजासिंह यांचा व्हिडिओ देखील विश्व हिंदू परिषदेकडून व्हायरल करण्यात आला आहे. (Maharashtra Political News)

T. Raja Singh
Bhandara Guardian Minister : सर्व नव्या पालकमंत्र्यांनी चार्ज घेतला, कामही सुरू केले; गावितांची अडचण काय?

दरम्यान, टी. राजासिंह हे सभेसाठी नगरमध्ये येणार असल्याने विश्व हिंदू परिषद आणि जय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. आमदार राजासिंह हे वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिस अलर्ट झाले आहेत. नगर जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश आहे. यात ही सभा होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नगर जिल्हा हिंदूत्ववादी संघटनांची प्रयोगशाळा झाली आहे. वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेले आमदार राजासिंह यांची देखील सभा नगरमध्ये होत आहे. त्यामुळे या सभेला परवानगी द्यायची की नाही, याची चाचपणी परवानगीसाठी अर्ज नसला आला, तरी स्थानिक पोलिस करत आहेत.

राजासिंहकडून नगरचा 'अहिल्यानगर' उल्लेख

नगर जिल्हा हिंदूत्ववाद्यांची प्रयोगशाळा झाली आहे. नगरच्या नामांतराचा मुद्दाही चर्चेत येत असतो. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात नगरचे 'अहिल्यानगर' करत असल्याची घोषणा केली होती.

तेव्हापासून हिंदुत्ववादी संघटना कार्यक्रम पत्रिकांवर 'अहिल्यानगर', असा उल्लेख करत आहेत. सभेसाठी नगरमध्ये येत असलेले भाजप आमदार टी. राजासिंह यांनीही व्हिडिओमध्ये नगरचा उल्लेख 'अहिल्यानगर' केला आहे. टी. राजासिंह व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. मात्र ते 'स्क्रिप्टेट' असल्याचे म्हटले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

T. Raja Singh
Chandrapur Bribe Case : 'दस्तनोंदणीसाठी १५ हजार रुपये दे;' महिला अधिकाऱ्याची लाचखोरी रंगेहाथ पकडली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.