MP Sujay Vikhe : " खासदार सुजय विखेंच्या मेंदूत केमिकल लोचा..."; ठाकरे गटाच्या नेत्याची बोचरी टीका

BJP Vs Shivsena (UBT) : " तुम्ही तुमची राजकीय सोय बघितली. या वृत्तीला..."
Sujay Vikhe
Sujay Vikhe Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : भाजप खासदार सुजय विखे यांनी हिवाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आगमनाची केलेली चेष्टा आणि विरोधकांच्या मेंदू तपासणीच्या भाष्यावर युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी टीका केली आहे.'राजकीय स्वार्थी वृत्तीमुळे यांच्याच मेंदूत केमिकल लोचा झाला असून, त्यांच्यावर तपासणीची वेळ आली आहे',असा उपरोधिक टोला ठाकरे गटाचे नेते विक्रम राठोड यांनी लगावला आहे.

युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यात त्यांनी खासदार सुजय विखेंवर जहरी टीका केली. ते म्हणाले, खासदारकीच्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात दोन हात केले, त्यांच्याच हातात हात घालून आज तुम्ही फिरत आहात. ही जनतेची फसवणूक नाही का? महापालिकेच्या एमआरआय सेंटरचे उद्घाटन करताना आपल्या विरोधकांचे मेंदू तपासण्याची भाषा करत असल्याची टीका केली.

Sujay Vikhe
Devendra Fadnavis : विधानपरिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, राज्यात 23 हजार 628 पोलीस भरती

पण आमचा विरोध हा तुमच्या राजकीय स्वार्थी वृत्तीला आहे. तेव्हा तुमच्या मेंदूत झालेला केमिकल लोचा अगोदर तपासून घ्यावा". शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हिवाळी अधिवेशनातल्या आगमनाची चेष्टा करण्याइतकी राजकीय हैसियत तुमची नाही, असा तिखट वार विक्रम राठोड यांनी खासदार सुजय विखेेंवर (Sujay Vikhe) केला.

खासदारकीची निवडणूक ज्यांच्याविरोधात लढलात त्यांनाच तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीत युतीचा धर्म तोडून मदत केली. तुम्ही तुमची राजकीय सोय बघितली. या वृत्तीला शिवसेनेने विरोध दर्शविला तर जाहीर भाषणातून तुम्ही याचा उल्लेख करून आम्हालाच आव्हान देत आहात. नगर शहरात ५०० रुपयांत एमआरआय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तुम्ही देतात. मग महापालिकेच्या एमआरआय तपासणी केंद्रालाच ते का सुरु करीत नाहीत, असा सवालही विक्रम राठोड यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर जिल्ह्याला राज्य सरकारने (State Government) देऊ केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण कोणत्या अधिकारात नाकारले, याचे देखील उत्तर तुम्हाला नगरकरांना द्यावे, लागेल, असेही राठोड यांनी सांगितले.

खासदार विखेंच्या दुखऱ्या नसवर ठेवले बोट

कोरोना काळात बेकायदेशीर पद्धतीने हेलिकॉप्टरने रेमडेसिविर इंजेक्शन्स आपण आणलीत. न्यायालयाने यावर आपल्याला फटकारल्याचे नगरकरांना माहित आहे. केवळ राजकीय सोयीसाठी सहमतीचे राजकारण करीत असल्याचे सोंग तुम्ही घेत आहात. नगरकरांची चालवलेली फसवणूक सर्वश्रुत आहे, असा गंभीर आरोप विक्रम राठोड यांनी केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sujay Vikhe
Loksabha Election : तीन राज्यांतील मुख्यमंत्री निवडीत भाजपचा 'महाराष्ट्र पॅटर्न'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com