Sinnar Milk Adulteration: सिन्नरच्या दूध भेसळ रॅकेटपुढे तुकाराम मुंढेही हतबल? नागरिकाचा आंदोलनाचा इशारा

Sinnar milk adulteration racket : सिन्नरमधील कथित दूध भेसळ रॅकेटमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दूध भेसळीवर कारवाई करण्याची मागणी करत एका नागरिकाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती वाचा.
29 officials write letter against Tukaram Mundhe
29 officials write letter against Tukaram MundheSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sinnar Milk Adulteration News: तुकाराम मुंढे यांनी भेसळ विरोधात राज्यभर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मात्र राजकीय आशीर्वादाने सुरू असलेल्या सिन्नरच्या भेसळ रॅकेट पुढे मुंडे यांचा विभागही हातबल असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकरणावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

सिन्नरचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी दूध भेसळ प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे उपसंचालक माने यांनी जुलै महिन्यात सिन्नरला चार ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत हेमंत पवार या भेसळ प्रकरणातील आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला.

29 officials write letter against Tukaram Mundhe
Sonia Gandhi : सोनिया गांधींच्या पहिल्या मुलाचा मृत्यू, अंत्यविधीवरून संभ्रम..., भावूक अनुभव सांगितला

या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाच्या आठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला. मात्र केवळ चार अधिकाऱ्यांनीच जबाब. दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. संशयित हेमंत पवार यांच्या विरोधात यापूर्वीही चार ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. मात्र कारवाई होऊ नये तो फरार आहे.

स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे वारंवार पाठपुरावा झाला. या धाडीत १७.३० लाखांची ८३९९ किलो भेसळीची पावडर व रसायने जप्त करण्यात आले. मात्र गुन्हा दाखल करण्यापलीकडे कोणत्याही संशयीता वर कारवाई न झाल्याने या प्रकरणातील गुढ आणखी वाढले आहे.

सिन्नर तालुक्यात पाचशेहून अधिक दूध संकलन केंद्र व शीतकरण केंद्र आहेत. मात्र अवघ्या 20 केंद्र कडून दूध संकलन व प्रक्रिया याची माहिती दिली जाते. अन्य दूध संकलन केंद्रात शेतकऱ्यांकडून संकलन केलेले दूध आणि पुढे प्रक्रिया व वितरण होणारे दूध यामध्ये मोठी तफावत आहे. भेसळीच्या माध्यमातून लाखो लिटर दूध तयार होते असा आरोप भाऊसाहेब बैरागी यांनी केला आहे.

29 officials write letter against Tukaram Mundhe
BJP MLA Son Accident : भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीचा अपघात, एक तरुणाचा मृत्यू , मद्यधुंद अवस्थेत...; काँग्रेसचा गंभीर आरोप

आता याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन व सविस्तर तक्रार देण्यात आली आहे. धडाडीचे अधिकारी असलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे दोन वेळा तक्रार करण्यात आली. मात्र भेसळ सुरूच असल्याने आता थेट आयुक्त मुंडे यांच्या कार्यालयापुढेच आंदोलनाचा इशारा बैरागी यांनी दिला आहे. त्यामुळे सिन्नरचे राजकीय आशीर्वादाने सुरू असलेले भेसळीचे रॅकेट राज्यभर चर्चेचा व वादाचा विषय करण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.