Milk Adulteration: भेसळखोरांना अन्न व औषध प्रशासनाचा आशीर्वाद? सिन्नरमध्ये तब्बल 464 दूध संकलन केंद्रांची नोंदणीच नाही!

Sinnar Milk Collection News: सिन्नर तालुक्यातील ४७८ दूध संकलन संस्थांपैकी केवळ १४ नोंदणीकृत असल्याची धक्कादायक माहिती. दूध भेसळ प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित.
Sinnar Milk Collection News
Sinnar Milk Collection Newssarkarnama
Published on
Updated on

Nashik FDA News: दूध भेसळखोरांनी हजारो नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू केला आहे. एकट्या सिन्नर तालुक्यात 400 हून अधिक संस्था दूध संकलन करीत आहेत. याबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

गेल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यातील चार संकलन केंद्रांवर छापा पडला. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईत १७.३७ लाखांचे ८३९ किलो भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळले. दिवसभर ही कारवाई सुरू होती.

Sinnar Milk Collection News
Nanded News: व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवलं! वरिष्ठांना दोष देत ZP शिक्षकाने दोन मुलांसह संपवलं आयुष्य; कारमध्ये बसून ती नदीत घातली

सिन्नर पोलीस ठाण्यात या संदर्भात प्रशांत रोहिदास काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वेगळाच होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित काळे आणि सूत्रधार दोघेही प्रसार झाले आहेत.

या संदर्भात दुसऱ्या कारवाईत अन्न व सुरक्षा अधिकारी हेमंत पवार यांच्या पथकाने दुसरा छापा उजनी, मीठसाखरे येथे टाकला. येथे अण्णा मसू सापनर आणि ज्ञानेश्वर पाटीलबा वर्पे हे दोघे संशयित पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. याबाबत पोलिस ठाण्यात नोंद आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मोठ्या प्रमाणावर सिन्नर तालुक्यात दूध संकलन केले जाते. विविध राजकीय नेत्यांची संबंधित 478 दूध संकलन संस्था काम करतात. मात्र यातील अवघ्या 14 संस्थांची अधिकृत नोंदणी आहे. 464 संस्था कुठेही नोंदलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Sinnar Milk Collection News
Nashik Crime: एकतर्फी प्रेमातून अमळनेरच्या विद्यार्थिनीची नाशिकमध्ये भररस्त्यात हत्या, हल्लेखोर युवक पसार

या संदर्भात भाऊसाहेब बैरागी आणि गणेश भाऊ ढवळे यांनी अनधिकृत दूध संकलन व भेसळ याचा पाठपुरावा केला आहे. राज्याच्या अन्न व भेसळ प्रशासन आयुक्तांकडे तक्रार केली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत हालचाल केलेली नाही.

स्थानिक पातळीवर दूध संकलन करणाऱ्या संस्था विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांशी संबंधित आहेत. या संस्था तसेच प्रक्रिया करणाऱ्या संस्थांच्या संचालकांची अल्पावधीतच प्रचंड भरभराट झाली आहे. त्यामुळे हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यवसायाला प्रशासनाचे संरक्षण तर नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com