Nashik Pune Railway: रेल्वेसाठी रोखला दोन तास रोखला नाशिक पुणे महामार्ग; आंदोलनातच मंत्री गिरीश महाजन यांचा आमदार तांबे यांना फोन!

Sinnar Nashik Pune Railway issue, Satyajit Tambe MP Rajabhau Vaje's road Block agitation -मंत्री गिरीश महाजन यांनी रस्ता रोको सुरू असताना भर सभेत रेल्वे प्रश्नावर दिले मोठे आश्वासन
Satyajeet-Tambe-Devendra-Fadanvis.jfif
Satyajeet-Tambe-Devendra-Fadanvis.jfifSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News: नाशिक पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच व्हावा. या मागणीसाठी आज मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाने पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. विरोधी पक्षाच्या खासदार आणि लोकप्रतिनिधींनी आंदोलनाद्वारे शक्तीप्रदर्शन केले.  

खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार डॉ सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली गोंदे फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. दोन तासाहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. 

यावेळी खासदार वाजे यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्ग झाला पाहिजे. त्यात कोणीही राजकारण करू नये. हा पुणे आणि नाशिकच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे रेल्वे प्रकल्प होईपर्यंत संघर्ष अटळ आहे असे सांगितले. 

Satyajeet-Tambe-Devendra-Fadanvis.jfif
Nashik Pune Railway : नाशिक-पुणे थेट रेल्वेसाठी CM फडणवीस मैदानात, डॉ. काकोडकर समिती नियुक्त; तांबे रास्ता रोकोवर ठाम!

आमदार सत्यजित तांबे यांनी गेली २५ वर्ष नाशिक पुणे रेल्वे होणार असे आम्ही ऐकत आलो. (कै) सुरेश कलमाडी यांनी मंत्री असताना ही योजना प्रत्यक्षात यावी यासाठी प्रयत्न केले. गेल्या काही दिवसात त्यात चांगली प्रगती झाली होती. मात्र राजकीय अडथळा आल्याने प्रश्न रेंगाळला. 

Satyajeet-Tambe-Devendra-Fadanvis.jfif
Satyajeet Tambe : आमदार सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात, गिरीश महाजनांच्या फोननंतरही आंदोलक आक्रमक

रेल्वे मार्गासाठी सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर, मंचर आणि चाकण मार्गे रेल्वे करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी भूसंपादन देखील झाले. आता हा रेल्वे मार्ग रद्द झाल्यास प्रशासन शेतकऱ्यांकडे पैसे मागायला येणार. शेतकऱ्यांनी कुठून पैसे द्यायचे? असा प्रश्न केला.

हे आंदोलन सुरू असतानाच मंत्री गिरीश महाजन यांचा आमदार तांबे यांना फोन आला. मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आपण आंदोलन करू नये. मागण्यांचा निश्चितपणे विचार केला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले. 

यावेळी आमदार तांबे यांनी मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला हेच सांगितले आहे. मात्र तज्ञांच्या समितीला कोणत्याही परिस्थितीत ६० दिवसानंतर मुदतवाढ देऊ नये. समितीने केवळ तांत्रिक बाजू न तपासता लोक भावनेचा देखील विचार करावा. प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणी केली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com