Sujay Vikhe Vs Sangram Jagtap : विखे-जगतापांची 'सहमती एक्सप्रेस'! खासदारकी - आमदारकीचा 'पूल' पार करणार ?

Lok sabha-Assembly Election : नेप्ती चौकातील सीना नदी पुलाच्या भूमिपूजनास खासदार विखे व आमदार जगतापांची हजेरी
Sujay Vikhe, Sangram Jagtap
Sujay Vikhe, Sangram Jagtap Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : नगर-कल्याण महामार्गावरील नेप्ती चौकाजवळील सीना नदीवर नवा पूल उभारण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन गुरुवारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने गेली काही वर्षे शहरात सुरू असलेली खासदार सुजय विखे आणि आमदार जगतापांची 'सहमती एक्सप्रेस' लोकसभा आणि विधानसभेसाठी सुसाट सुटण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर नगर शहरातील नेप्ती चौकाजवळ सीना नदीवर हा नवा पूल बांधण्यात येणार आहे. सध्याचा येथील पूल जुना असून पावसाळ्यात पाण्याखाली जातो. परिणामी नगर-कल्याण महामार्ग वाहतूक अनेकदा ठप्प होते. तसेच या परिसरातील शिवाजीनगर, नालेगाव, भूषणनगर या भागातील शहरांतर्गत वाहतूकही विस्कळीत होते. या पार्श्वभूमीवर नव्याने येथे होणाऱ्या दुपदरी उंच पुलाने नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गासह स्थानिक वाहतुकीचाही प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

Sujay Vikhe, Sangram Jagtap
Pasha Patel News : पद शोभेचं पण त्याला 'कॅबिनेट'चा मुलामा ! भाजपला पाशा पटेलांची आताच आठवण का ?

विखे-जगतापांच्या हस्ते भूमिपूजन

खासदार विखे पाटील व आमदार जगताप यांच्या शुभहस्ते 23 नोव्हेंबरला सीना नदीच्या पुलाचा भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमास भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, शिवसेना दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिलराव शिंदे, महापौर रोहिणी शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. एकूणच या निमित्ताने शहरात महायुतीची मोट बांधण्यास खासदार विखे यशस्वी होताना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पुलाच्या कामाच्या निधीसाठी सुजय विखे आणि संग्राम जगताप यांनी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्याची दखल घेऊन निधी मंजूर करण्यात आला आहे. कल्याण-अहमदनगर-पाथर्डी-नांदेड-निर्मळ या 214 किलोमीटराच्या राष्ट्रीय महामार्गावरील सीना नदीवर जोड रस्ता, पुलासह इतर कामांसाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने 27.16 कोटी रकमेस मंजुरी दिली आहे.

Sujay Vikhe, Sangram Jagtap
Pankaja Munde News : 'मी थांबणार नाही' म्हणणाऱ्या पंकजा मुंडे परिक्रमा यात्रेनंतर का थांबल्या,भाजपची आडकाठी ?

भाजप खासदार विखे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार जगताप यांची 'केमिस्ट्री' गेल्या लोकसभा निवडणुकीपासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिली आहे. 2019 ला सुजय विखे हे लोकसभेला भाजप उमेदवार होते. तर त्यांच्या समोरच्या शरद पवारांनी संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीकडून मैदानात उतरवले होते. निवडणुकीच्या निमित्ताने या दोघांनीही एकमेकांवर विखारी टीका केली. मात्र विखेंनी जगताप यांना तीन लाखावर मतांनी पराभूत केले.

त्यानंतर या दोघांतील जवळीक विविध कारणाने जिल्ह्यात चर्चेत राहिली. आमदार जगताप एकत्रित राष्ट्रवादीत असतानाही ही जवळीक शहरातील उड्डाणपुलाच्या निमित्ताने पुढे आली. आता तर आमदार जगताप अजित पवार गटात असून महायुतीत आहेत. अशात या दोघांनी एकत्र येणे वावगे नसले तरी आमदार राम शिंदे, आमदार निलेश लंके यांची वक्तव्ये, अपेक्षा पाहता विखे-जगताप यांचे जमलेले मेतकूट विखेंना दिलासादायक मानले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sujay Vikhe, Sangram Jagtap
Manoj Jarange Patil : जरांगेंच्या ताफ्याची काय आहे खासियत? खर्च कोण करतं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com