Sujay Vikhe claim : विखे विरोधक अशोक खरातचं मार्गदर्शन घ्यायचे! 'शनी शांत करणारा नेता मीच', सुजय विखेंचा अनोखा दावा

Sujay Vikhe alleges that Minister Radhakrishna Vikhe earlier consulted political opponent Ashok Kharat for guidance in Shirdi constituency : शिर्डी विधानसभेत आत्तापर्यंत आमच्या विरोधातले जेवढे उमेदवार राहिलेत, त्या सर्वांचा मार्गदर्शक अशोक खरातच होता, असा दावा सुजय विखे पाटील यांनी करत त्यावर प्रतिक्रिया दिली.
Sujay Vikhe claim
Sujay Vikhe claimSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Nashik : नाशिक जिल्ह्यातील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची सर्वाधिक पाळेमुळे ही शिर्डीत असल्याचं पोलिस समोर येत आहेत. अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना हिच्यासह पाच जणांविरोधात बेकायदेशीर सावकारकी आणि बेकायदेशीर जमीन व्यवहारप्रकरणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

याशिवाय समता नागरी पतसंस्थेच्या शिर्डी शाखेत त्याच्या व्यवहाराची वारसदार म्हणून शेकडो खाती सापडली आहेत. यावरून शिर्डी पोलिसांनी कारवाईचा पंजा कसला असताना, भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विखे पाटील विरोधक अशोक खरात याच्याकडे कसे जायचे, यावर प्रतिक्रिया देत खळबळ उडवून दिली आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विखे पाटील परिवार विरोधक जेवढे उमेदवार आहेत, या अगोदर राहिलेले, त्या सगळ्यांना अशोक खरात (Ashok Kharat) हा मार्गदर्शन करायचा, असा दावा सुजय विखे पाटील यांनी केला आहे. तसंच आपण कोणत्याही बाबाकडे जात नाही. पण लोक आपला शनी शांत करण्यासाठी माझ्याकडे येतात, अशी मिश्किल टिप्पणी विखे पाटील यांनी केली.

अशोक खरात याच्या गुन्ह्यावर (Crime) भाष्य करताना सुजय विखे पाटील म्हणाले, "अशोक खरातविषयी गुन्हे दाखल झालेले आहेत. विशेष पथकाकडून तपास सुरू आहेत. जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. जबाबात जी नावं समोर येत आहेत, त्या नावानुसार संबंधितांचा शोध घेऊन, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. रोज नव नवीन नावं समोर येत आहेत. सगळ्यांना पोलिसांच्या नोटिसा गेल्या आहेत. कोण कोणाचा कार्यकर्ता आहे, कोण कोणाचा पदाधिकारी आहे, या गोष्टीचा केसची संबंध नाही."

Sujay Vikhe claim
Nilesh Lanke Controversy : 'तुम्ही कुठलेही कॉन्ट्रोव्हर्सी काढा, तो व्यक्ती दिसणारच'; विखे पाटलांनी केरळम् वरून येताच नीलेश लंकेंना डिवचलं

'प्रत्येक जण हा त्याचा अनुयायी असेल, हा त्याचा वैयक्तिक जीवनाचा प्रश्न आहे. सगळ्या पक्षाचे त्याच्याकडे जायचे. आमचे विरोधक असतील, काही आमच्याबरोबरचे आहेत. त्यामुळे ती व्यक्ती आणि पक्ष, निगडीत आहेत, असे काही होत नाही. सर्वपक्षीय लोक तिकडं जात होते. बऱ्याच जणांना हौस आमदार होण्याची हौस होती. जेवढे शिर्डी विधानसभेतील विरोधक उमेदवार, या अगोदर राहिले आहेत, त्या सगळ्यांचे मार्गदर्शक अशोक खरात राहिले आहेत,' असा दावा सुजय विखे पाटील यांनी केला.

Sujay Vikhe claim
Vikhe Patil Controversy : मंत्री विखेंचा फोटो अन् खरात कनेक्शन; सपकाळांचा राजकीय ‘टायमिंग’ गेम!

मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा फोटो, अशोक खरात बरोबर वारंवार समाज माध्यमांवर दाखवला जात आहेत. त्यावर बोलताना, सुजय विखे पाटील म्हणाले, "तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीला आले होते. त्यावेळी मंत्री विखे पाटील साहेब पालकमंत्री होते. जेव्हा मुख्यमंत्री दौऱ्यावर येतात, तेव्हा पालकमंत्री म्हणून त्यांच्या स्वागताला उभं राहणं हा प्रोटोकाॅल असतो. त्यानुसार, मंत्री विखे पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री जिथे गेले, तिथं पालकमंत्री गेले, हा प्रोटोकाॅल आहे. त्यानुसार विखेसाहेब त्यांच्याबरोबर होते. तेच माध्यमांमध्ये दाखवले गेले. बाकीचा काही संबंध नाही."

अशोक खरातचे शिर्डी आणि साकुरीमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात जाळ सापडत असताना, विखे पाटील परिवाराचा कुठेही नाव सापडत नाही. हेच आमच्या परिवाराची ख्याती आहे. कुठल्याही स्कैंडलमध्ये, स्कॅममध्ये विखे पाटील परिवाराचं नाव सापडत नाही, हीच आमची ख्याती आहे. मी अशा कोणत्याही बाबाला भेट नाही, उलट लोक आपला शनी शांत करण्यासाठी माझ्याकडे येतात, अशी टिप्पणी विखे पाटील यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com