Sujay Vikhe News: 'मी माजी झालोय,मतदारांनी आपल्यालाच बदलून टाकलंय, आता आपलं काम एकच...'; विखेंच्या पराभव जिव्हारी

Ahmednagar Politics : महसूलमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील हे या कार्यक्रमाला पोहचू शकले नाही. त्यामुळे सुजय विखे हे श्रीरामपूर येथील कार्यक्रमासाठी आले होते.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातील लढत राज्यात गाजली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके आणि भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्यात थेट लढत झाली.त्यात लंके यांनी विखेंना पराभवाची धूळ चारत जायंट किलर ठरले.

पण हा पराभव त्यांच्या आणि समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.आता सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) आपल्या पराभवाची खंत पुन्हा एकदा जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे.

श्रीरामपूर येथे एका कार्यक्रमात गुरुवारी(ता.8) माजी खासदार सुजय विखे पाटील हे बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून ते सध्याच्या बदलत्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. महसूलमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे या कार्यक्रमाला पोहचू शकले नाही. त्यामुळे सुजय विखे हे श्रीरामपूर येथील कार्यक्रमासाठी आले होते.

सुजय विखे म्हणाले, मी आता माजी झालो असून मला कोणतीही घोषणा करण्याचा अधिकार राहिलेला नाही.माजी सरपंच आणि माजी खासदार एकच असतो. आपलं काम आता फक्त निवेदन द्यायचं राहिलं आहे. मी नवीन ग्रामपंचायतीची घोषणा करू शकत नाही,जिल्हा तर फार मोठा विषय आहे. मतदारांनी आपल्यालाच बदलून टाकलंय, आपण कुणाची बदली करणार आहोत अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली.

Sujay Vikhe Patil
Ajit Pawar : भविष्यात ठेच पोचू नये म्हणून यात्रा काढली; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या भाषणात श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी मागणी लावून धरली. त्यांनी सुजय विखे यांच्याकडे तुम्ही जिल्हा होणार तर श्रीरामपूरच अशी घोषणा करून टाकण्याची आग्रही भूमिका मांडली.

यावर सुजय विखे म्हणाले,लोखंडेसाहेब तुम्ही जिल्हा जाहीर करा, यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण मी फार छोटा माणूस असून मला कॉन्स्टेबल, तलाठी अशी कामं सांगावीत. एवढे मोठे काम माझ्याकडून होणार नाही. एखाद्या जिल्ह्याची घोषणा करायला मी एवढा मोठा नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

Sujay Vikhe Patil
Nana Patole Vs BJP : काँग्रेसच्या नाना पटोलेंचा गडकरी- फडणवीसांना बालेकिल्ल्यातच दे धक्का; जवळच्या मेघे कुटुंबालाच फोडलं

मुंबईहून श्रीरामपूरकडे निघालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला अन् त्यांना या कार्यक्रमासाठी वेळेत दाखल होता आले आले . त्यामुळे या कार्यक्रमाला माजी खासदार सुजय विखे उपस्थित राहिले. यावरही त्यांनी विनोदी शैलीत भाष्य केले.

ते म्हणाले,आमच्या घरात सध्या माझी भूमिका स्टेपनीची आहे.गाडीचे मुख्य टायर पंक्चर होते,तेव्हा माझा स्टेपनीसारखा वापर करुन कार्यक्रमाला पळवण्यात येतं असं मिश्किल टिप्पणी विखे पाटील यांनी केली.

Sujay Vikhe Patil
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या दोन जागांसाठी महायुतीमध्ये 'टफ फाइट'; 'या' चार दिग्गज नेत्यांच्या नावांची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com