Ajit Pawar : भविष्यात ठेच पोचू नये म्हणून यात्रा काढली; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar NCP : आज पक्षाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच आहे. त्यामुळे आता काही निर्णय घ्यायचे असल्याने जनमाणसांत मिसळावे लागते. त्यांची मते जाणून घ्यावी लागतात.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकी महायुतीची मोठी वाताहात झाली होती. ती स्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी महायुतीतील प्रमुख घटक पक्षांनी घेतली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपापल्या यात्रा काढून मतदारांपर्यंत पोचण्याची शक्कल लढवली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वातील जनसन्मान यात्रेचा गुरुवारी नाशिकमधून शुभारंभ झाला आहे. ही यात्रा भविष्यात ठेच पोचू नये यासाठी काढण्यात आल्याची स्पष्ट मत अजित पवारांनी व्यक्त केले. ते एका खासगी चॅनेलला बोलत होते.

अजित पवार म्हणाले, पूर्वी एखादी चूक झाली तर शरद पवारसाहेब ती निभावून नेत होते. आज पक्षाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच आहे. त्यामुळे आता काही निर्णय घ्यायचे असल्याने जनमाणसांत मिसळावे लागते. त्यांची मते जाणून घ्यावी लागतात. लाडकी बहीण ही योजना महिला सबलीकरणासाठी राबवली जात आहे. त्याला प्रतिसाद मिळत असून पावणे दोन कोटीपर्यंत फॉर्म भरले गेले आहेत. त्यातील सव्वा कोटी फॉर्म वैध ठरले असून त्यांना तीन हजार रुपये मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार Ajit Pawar 35 वर्षांपासून राजकारणात आहेत. मात्र त्यांनी यावेळी जनसन्मान यात्रा काढावी लागली आहे. याबाबत छेडले असता त्यांनी माझ्यावर जबाबदारी आलेली आहे. जनतेत जाऊन मला माझी भूमिका मांडणे गरजेची आहे. भूतकाळात ठेच लागल्याने भविष्यात ठेच लागू नये, म्हणून यात्रा काढलेली आहे. लोकसभेत थोडक्या मतांनी महायुतीचा पराभव झाला आहे. ती मते वाढवण्यासाठी यात्रा काढल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Ajit Pawar : मुख्यमंत्री शिंदेंचा सांगावा! अजितदादा नाशिक दौरा सोडून तातडीने मुंबईकडे रवाना

लोकसभेत एससी आणि एसटी समाजातील मतदारांनी दुर्लक्ष केले. संविधान बदलाचा नरेटिव्ह विरोधकांनी सेट केला, त्यामुळे मोठा फटका बसला. आरएसएसच्या मुखपत्रांतून लोकसभेतील वाताहतीला अजित पवार जबाबदार असल्याची टीका केली होती. त्यावर विचारले असता पवार म्हणाले, लोकशाहीत व्यक्ती स्वातंत्र्याचा आधिकार आहे. त्यामुळे कुणीही टीका करू शकतात.

आम्ही मात्र भाजपला बांधील असून झालेल्या टीकेवर जास्त विचार करत नाही. उलट त्या टीकेबद्दल भाजपने विचार करायला हवा होता. आता कुणावरही वैयक्तिक टीका करणार नाही. कुणी टीका केली तर त्याला उत्तर देणार नाही. माझा फोकस फक्त विकासावरच असेल, असेही पवारांनी स्पष्ट केले.

अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर अजित पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणल्याचा आरोप आहे. त्यावर पवार म्हणाले, देशमुख यांनी घटनेच्या दोन वर्षांनंतर हे प्रकरण बाहेर काढले आहेत. ज्यावेळी त्यांना अटक झाली होती, त्याच वेळी त्यांनी झालेल्या सर्व गोष्टी सांगायला हव्या होत्या. आता त्याला जास्त अर्थ राहिला नसून कुणाचाही त्यावर विश्वास नाही. जे काही सुरू आहे, त्यात मला पडायचे नाही. यातून लोकांचा काहीही फायदा होणार नाही, असेही अजित पवारांनी सांगितले.

अजितदादांचा वादा

राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी अनेकदा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामुळे योजनांना कुठून पैसा काढायचा हे चांगले माहिती आहे. आता राज्यात सुरू केलेल्या लोककल्याण योजना यापुढेही कायम राहणार आहेत. त्या कोणत्याही स्थितीत बंद होणार नाहीत. महिलांना पुढच्या आठवड्यात तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. हा अजितदादाचा वादा म्हणून लोकांना सांगतो, असा दावाही अजित पवारांनी केला.

Ajit Pawar
ED officer arrested: मुंबईतील ज्वेलर्सला दिली धमकी; ईडीच्या सहाय्यक संचालकाला सीबीआयकडून अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com