Nashik BJP : 'नाशिक'मधून भाजपला साधू-महंतांचेच पहिले आव्हान! पक्षांतर्गत तिढा वाढणार

Shantigiri Maharaj : नाशिकमधून उमेदवार निवड करताना भाजपपुढे आव्हान
Swami Kanthanand, Shantigiri Maharaj
Swami Kanthanand, Shantigiri MaharajSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : नाशिक लोकसभा जागा भाजपा लढणार की शिवसेना (शिंदे गट) हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या जागेवर लढण्यासाठी स्वामी कंठानंद आणि महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज पुढे आले आहेत. शांतीगिरी महाराजांचा भक्तपरिवार मोठा आहे, तर कंठानंद स्वामींचे सामाजिक काम मोठे आहे. त्यांच्यासाठी काही उद्योजक, व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी थेट देवेंद्र फडणवीसांना साकडे घातले आहे. साधू-महंतांचा लोकसभेतील इंटरेस्ट लक्षात घेता भाजपा नाशिकच्या जागेबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तसे सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार पुढे येऊ लागले. भाजपाकडून आमदार राहुल ढिकले, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासह इतर काही नावे पुढे येतात. तुम्ही कामाला लागा, असा सल्लाही पक्षाच्या नेत्यांनी दिल्याचा दावा इच्छुक उमेदवारांकडून केला जातो. मात्र, सुरू असलेल्या चर्चांना फाटा द्यायचा, सर्वांना अचंबित करणारी घोषणा करायची अन् बाजी मारायची, अशी स्टाईलच भाजपने विकसित केली आहे.

Swami Kanthanand, Shantigiri Maharaj
Devendra Fadnavis : काँग्रेसनंतर राष्ट्रवादी फोडणाऱ्या महाजनांची जबाबदारी वाढणार; फडणवीसांचं सूचक वक्तव्य

नव्या स्टाईलचा वापर नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत होऊ शकतो, असा अंदाज बांधला जातो आहे. मात्र, यावेळी भाजपाचे धोरण पुढे येण्यापूर्वीच स्वामी कंठानंद आणि महामंडलेश्वर लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. स्वामी कंठानंद हे रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्यपरंपरेतील आहेत. २००५ मध्ये त्यांनी श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान सुरू केले. या माध्यमातून ते समाजसेवा करीत आहेत. याचमुळे भाजपाकडून स्वामींना उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.

Swami Kanthanand, Shantigiri Maharaj
Manoj Jarange News : मोठी बातमी! मनोज जरांगेंनी केली नवीन घोषणा, 10 फेब्रुवारीपासून...

त्यातच आता शांतीगिरी महाराजांनी (Shatigiri Maharaj) आपण नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. जय बाबाजी भक्तपरिवाराचा आग्रह असून, निवडणूक लढवून देशसेवा हीच ईशसेवा हे ब्रीदवाक्य खरे करण्याची वेळ आल्याचे महाराजांनी म्हटले. धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जोडलेला भक्तपरिवार, तसेच महाराजांचे मूळच नाशिक जिल्ह्यातील असल्याचा फायदा त्यांना मिळू शकतो. मात्र, लोकसभा निवडणुकीत थेट साधू महंत उतरल्याने भाजपची पंचाईत होऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंदूत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाताना या साधू-महंतांना बरोबर घ्यायचे म्हटले तर इच्छुक राजकीय कार्यकर्त्यांचा हिरमोड होऊ शकतो. दुसरीकडे, साधू-महंतांनी माघार घेतली नाही, तर भाजपला (BJP) त्यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. एकंदरीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील वाढते हिंदूत्व उमेदवारी जाहीर करताना भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटली तरी यापेक्षा वेगळी परिस्थिती राहणार नाही. यातून काय मार्ग निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

R...

Swami Kanthanand, Shantigiri Maharaj
NCP Hearing : शरद पवारांकडून दुसऱ्या चिन्हाची चाचपणी? राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवरून चर्चेला उधाण!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com