Women Exploitation Case : ‘बाबा’ की भक्षक? महिलेकडून लाखो उकळून दागिनेही घेतले; शरीरसुखासाठी घरी जाणारा भोंदू आढावबाबा अटकेत

Shrirampur Police arrested self-styled godman Ashok Adhav Taklibhan allegedly exploiting women physically and financially; court remanded police custody : तंत्र-मंत्राच्या नावाखाली विवाहितेची आर्थिक फसवणूक आणि विनयभंग केल्याप्रकरणात श्रीरामपूर इथला दुसरा भोंदूबाबा याला अटक केली आहे.
Women Exploitation Case
Women Exploitation CaseSarkarnama
Published on
Updated on

women harassment case Maharashtra : गेली तीन वर्षभर, विविध जडीबुटी देण्याच्या नावाखाली, 15 ते 16 लाख रुपये उकळले, दागिने काढून घेतले, एवढ्यावर न थांबता, शरीरसुखाची मागणी करत भोंदूबाबा महिलेच्या घरी पोहोचला.

या प्रकाराला कंटाळून अखेर पीडिता महिलेने टाकळीभान इथला भोंदूबाबा अशोक मधुकर आढाव याच्याविरोधात तक्रार देताच, श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. अशोक मधुकर आढाव उर्फ आढावबाबा याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तंत्र-मंत्राच्या नावाखाली विवाहितेची आर्थिक फसवणूक आणि विनयभंग केल्याप्रकरणी अशोक आढाव याला अटक करताच, यापूर्वी अटक केलेल्या भोंदू गणेशबाबा आणि आढावबाबा यांच्यातील पैसा कमवण्याच्या कारनाम्यांच्या चर्चांना तोंड फुटलं आहे. भोंदूबाबाचा हा दुसरा प्रकार उघडकीस आल्याने श्रीरामपूर (Shrirampur) भोंदूबाबांचा अड्डा असल्याच्या चर्चा होत असून, वेगवेगळ्या बाबांची नावे चर्चेत आली आहेत.

​फिर्यादी महिलेला होत असलेल्या शारीरिक त्रासाचा फायदा घेत, अशोक आढाव याने भूतबाधा उतरवण्याचे आमिष दाखवले. फेब्रुवारी 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत त्याने महिलेला (Women) जडीबुटी खाण्यास देऊन वेळोवेळी दक्षिणेच्या नावाखाली रोख आणि ऑनलाइन माध्यमातून सुमारे 15 ते 16 लाख रुपये उकळले. इतकेच नाही तर सोन्याच्या वस्तूही लांबवल्या. पैशाचा हव्यास एवढ्यावरच थांबला नाही, तर आढावने फिर्यादीच्या राहत्या घरी जाऊन शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Women Exploitation Case
Fake Godman Arrest : ‘महाराज’चा खेळ खल्लास! अंनिसचा पाठपुरावा, भोंदूगिरीत राजेंद्र गडगेसह पाच जण गजाआड

पीडित महिलेने धाडस दाखवून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अशोक आढावविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Women Exploitation Case
Fake Baba Exposed : धक्कादायक! भोंदू राजेंद्र गडगेकडे 200 व्हिडिओ, 10 बँक खाते, 13 मालमत्ता; पोलिस तपासात मोठा खुलासा

आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. डी. जाधो यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने आठ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी वकील माडेकर यांनी बाजू मांडली. आरोपीच्या वतीने ॲड. आरिफ शेख व ॲड. जावेद शेख यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

श्रीरामपूर तालुका भोंदूगिरीचा अड्डा ?

​बेलापूर खटकाळी येथील गणेशबाबाच्या प्रकरणानंतर आता टाकळीभानमधील या घटनेमुळे श्रीरामपूर तालुका भोंदूगिरीचा अड्डा बनत चालला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. गणेश बाबाने ज्याप्रमाणे राजकीय वरदहस्तातून कोट्यवधींचे साम्राज्य उभारले, त्याच धर्तीवर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक 'बाबा' अगतिक महिलांची फसवणूक करत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. पोलिस निरीक्षक धनवडे स्वतः या प्रकरणाचा तपास करत असून, अशा भोंदूबाबांपासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com