TCS Nashik Case : कॅन्सरग्रस्त बापासाठी हिंदू तरुणीने सोसला कार्पोरेट जिहाद, नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी..

Nashik TCS BPO conversion Case: नाशिकमधील टीसीएस कंपनीत घडलेल्या धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राष्ट्रीय महिला आयोगाने हे प्रकरण हाताशी घेतले आहे. आयोगाचे पथक नाशिकमध्ये तळ ठोकून आहे.
Nashik conversion case investigation latest news
Nashik conversion case investigation latest newsSarkarnama
Published on
Updated on

Nashik TCS Case: नाशिकमधील TCS कंपनीतील हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरण आता गंभीर वळणावर येऊन ठेपलं आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतः लक्ष घातले असून येथील टीसीएस कंपनीला भेट देत चौकशी केली.

राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. चार सदस्यांच्या या पथकाने रविवारी पीडित तरुणींशी चर्चा करुन हे प्रकरण समजून घेतलं. मात्र त्याचा तपशील पथकाकडून उघड करण्यात आलेला नसला तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

संशयितांनी पीडित तरुणींच्या हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत कशाप्रकारे त्यांचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला याचे विदारक चित्र आता समोर आले आहे. या संशयितांनी केवळ लैगिंक शोषण व विनयभंगच नव्हे तर धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी ९ गुन्हे दाखल असून सात संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. एक महिला संशयित निदा खान फरार आहे.

Nashik conversion case investigation latest news
Nashik Crime News : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपींचा पाय खोलात, ॲट्रॉसिटी’चे कलम वाढले...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एका पीडित तरुणीने केवळ आपल्या कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी हा 'कॉर्पोरेट' जिहाद अर्थात अत्याचार व छळ सहन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वडिलांची किमोथेरपी तसेच औषधांच्या खरेदीसाठी पैशांची गरज असल्याने, तिने कंपनीत वरिष्ठ पदावर असलेल्या संशयित तरुणांकडून होणारा मानसिक छळ आणि अपमान निमूटपणे सहन केला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे नोकरी टिकवणे ही तिची मजबुरी होती, ज्याचा फायदा संशयित मुस्लीम तरुणांनी घेतला.

Nashik conversion case investigation latest news
Nida Khan : धर्मांतर प्रकरणातील फरार निदा खान गरोदर, कुटुंबियांचा खळबळजनक दावा ; अटकपूर्व जामीन मिळणार का?

एका दुसऱ्या पीडितेने राष्ट्रीय महिला आयोगासमोर अशीच धक्कादायक बाब सांगितली. आपल्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने नोकरी टिकवून ठेवणं गरजेचं आहे. हीच गोष्ट संशयितांनी हेरुन तिला नोकरीच्या बदल्यात धर्मांतर करण्याच्या छुप्या अजेंड्याला बळी पाडण्यात आले. 'वडिल आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले आहेत आणि घरची भूक मिटवण्यासाठी मला हे सर्व सहन करावे लागले,' अशी आपबिती तीने सांगितली.

याप्रकरणाचा तपास करण्याठी नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एसआयटी नियुक्त केली आहे. काही केंद्रीय तपास यंत्रणाही याप्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणातील गांभीर्य पाहात राष्ट्रीय महिला आयोगाचे पथकही नाशिकमध्ये शनिवारपासून दाखल आहे.

अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाला सादर करणार

राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाच्या प्रमुख व उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासह निवृत्त पोलिस महासंचालक वि. के. सिन्हा, अॅड. मोनिका अरोरा आणि महिला आयोगाच्या समन्वयक लीलावती ही चार सदस्य समिती नाशिकमध्ये तळ ठोकून आहे.

रविवारी कंपनीत जाऊन या पथकाने येथील पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, कामाचे विविध विभाग आणि सुरक्षितता, कॅन्टीन आणि वेटिंग रूममधील सीसीटीव्ही फुटेज व व्यवस्थेची तपासणी केली. पीडीत तरुणांशी संवाद साधला. येत्या आठवडाभरात हे पथक या प्रकरणाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाला सादर करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com