Nashik Mhada Scam : तहसीलदार नितीन पाटलांना अटक, मुख्यमंत्री फडणवीसांच्या घोषणेनंतर पोलिसांना आली जाग, तब्बल 150 कोटींचा घोटाळा?

Nitin Patil Arrested Polics CM fadnavis : पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत नाशिकचे अप्पर तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली आहे.
MHADA housing scam investigation in Nashik
MHADA housing scam investigation in NashikSarkarnama
Published on
Updated on

MHADA News: म्हाडा महापालिका आणि महसूल विभागाच्या मोठ्या घोटाळ्यात पोलीस चाचपडत होती. या संदर्भात उशिरा जागे झालेल्या पोलिसांनी आता कारवाई केली आहे. यासंदर्भात नाशिकच्या अप्पर तहसीलदार नितीन पाटील यांना अटक झाली आहे.

नाशिक शहरातील या घोटाळ्यात शहरातील आमदार सीमा हिरे यांचं विविध राजकीय नेत्यांनी विधिमंडळात आवाज उठविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील मंत्री असताना या घोटाळ्यावर भाष्य केले होते. मात्र यंत्रणांनी यावर कारवाई करण्याचे टाळले होते.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी थेट एसआयटीची घोषणा केली. महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. एसआयटी स्थापन करण्यात आली होती.

या घोटाळ्यात पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. नाशिकचे अप्पर नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक करण्यात आली आहे. पाटील यांनी 31 प्रकरणांमध्ये तुकडे बंदी कायद्याचा दुरुपयोग केला. नियमबाह्य पद्धतीने एक एकर क्षेत्राच्या भूखंडाचे विभाजन केले. त्यामुळे म्हाडाच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव 20 टक्के सदनिका बांधकाम व्यवसायिकांना विक्री करण्याची मुभा मिळाली.

या प्रकरणात बांधकाम व्यवसायिकांनी विविध यंत्रणांना हाताशी धरून सुमारे 150 कोटींचे फ्लॅट विकले. हे फ्लॅट नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव होते. नाशिकचा हा घोटाळा राज्यभर चर्चेत आहे. त्यात उशिरा जागे झालेल्या पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. बिल्डर आणि महापालिका यंत्रणेतील संशयीतांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागले आहे.

MHADA housing scam investigation in Nashik
Shaktipeeth : फडणवीसांच्या ड्रिम प्रोजेक्ट 'शक्तीपीठ'ला तीव्र विरोध; शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, महामार्गासाठी जमीन नाहीच

आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव 20 टक्के सदनिकांचा हा घोटाळा आहे. सुमारे 150 कोटींच्या या घोटाळ्यात पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांत पोलिसांनी यावर काहीही कारवाई केली नव्हती.

यासंदर्भात 194 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यात शहरातील 49 प्रतिष्ठित बिल्डर आहेत. सोनू मनवानी आणि दीपक कर्मचंदानी या दोघांना अटक करण्यात आली होती. उर्वरित बिल्डर मात्र मोकाट होते.

या घोटाळ्यातील बहुतांशी बिल्डर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. पाटील यातील काही बिल्डरला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र पोलीस आणि यंत्रणांकडून बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे धाडस होत नव्हते.

MHADA housing scam investigation in Nashik
Khatal And Tambe Power Show : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या स्वागताचा 'हायव्होल्टेज ड्रामा'! खताळांची हेलिकॉप्टरकडे झेप, तर तांबे दाम्पत्य गाडीसमोर आडवे; राजकीय रंगत शिगेला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com