Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी ठाकरे गटाच्या नगरसेविकेचा राजीनामा

Ahmednagar ShivSena : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात राजकीय वातावरण तापलं
Ahmednagar Shiv Sena
Ahmednagar Shiv Sena Sarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे :

Ahmednagar News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरमधील कमल सप्रे यांनी आज नगरसेविका पदाचा राजीनामा दिला आहे. नगर महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्याकडे त्यांनी आपले राजीनामा पत्र सादर केले. शिवसेना शिंदे गटाचे मदन आढाव यांचा राजीनामा मंजूर होत नाही तोच, शिवसेना ठाकरे गटाच्या कमल सप्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Ahmednagar Shiv Sena
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी शिवसेनेच्या 'या' नेत्याचा नगरसेवक पदासह पक्षाचाही राजीनामा

कमल सप्रे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, "सकल मराठा समाज 40 वर्षापासून आरक्षणासाठी लढा देत आहे. राज्यकर्ते फक्त मराठ्यांचे राजकारणासाठी वापर करतात. राज्य सरकारला आरक्षणासाठी बळी हवे आहेत. आज समाजबांधवावर होणारा अन्याय सहन होत नसल्यामुळे ज्या समाजामुळे मला पद मिळाले, त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी नगरसेविका पदाचा राजीनामा देत आहे. यापुढे समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढणार आहे", असे कमल सप्रे यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, आणि अहमदनगरच्या नागापुर-बोल्हेगांव परिसरातील नागरिकांना न्याय मिळावा, यासाठी हा राजीनामा देत असल्याचे कमल सप्रे यांनी सांगितले.

तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा दिला असला तरी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा असून सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावे, असे कमल सप्रे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Ahmednagar Shiv Sena
Maratha Reservation : जरांगे पाटलांची मोठी मागणी होणार पूर्ण?; राज्य सरकारच्या हालचालींना वेग, फडणवीस राज्यपालांना भेटले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com