Thackeray Group : राष्ट्रवादीचे शिर्डीत अधिवेशन पण, ठाकरेंच्या डोक्याला ताप; नेत्याच्या डोक्यात बंडाची हवा

Babanrao Gholap On Shirdi Lok Sabha Constituency : शिर्डी लोकसभा मतदारसंघावर एकाच वेळी अनेक पक्ष आणि इच्छुकांनी दावा...
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ बनले आहे. लोकसभेचा हा मतदारसंघ सर्वच राजकीय पक्षांसाठी हॉट डेस्टिनेशन झाला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.

शिर्डी येथे आजपासून शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अधिवेशन होत आहे. महायुतीतील घटक असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचा येथे खासदार आहे. शरद पवार गटाचे हे अधिवेशन लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होत असल्याचे स्पष्ट आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघावर शिवसेना Uddhav Thackeray गटाचा दावा आहे. ठाकरे गटाकडून माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे प्रमुख उमेदवार चर्चेत आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिर्डी मतदारसंघ कोणाकडे जातो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Uddhav Thackeray
Maratha Reservation : शिंदेंच्या खासदाराविरोधात मराठा समाजात प्रचंड रोष; दिला उघड इशारा

गेल्या तीन निवडणुकांपासून या मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची उमेदवारीसाठी चर्चा असते. पण ऐनवेळी वेगळाच उमेदवार पुढे येतो. या पार्श्वभूमीवर घोलप यांनी 'सरकारनामा'शी बोलताना माहिती दिली.

हा मतदारसंघ सगळ्याच राजकीय पक्षांना हवा आहे. मात्र, तो शिवसेनेचा आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये येथे शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. हा खासदार माझ्यामुळे निवडून येतो. पण उमेदवारीच्या वेळेस मी कुठेतरी बाजूला असतो. यंदा मात्र तसे होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून यंदा मी उमेदवारी करणार आहे. समर्थकांचा आग्रह वाढल्यास प्रसंगी अपक्ष उमेदवारी करण्याचा देखील विचार आहे, असे घोलप यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील भाजपकडे शिर्डी मतदारसंघाची मागणी केली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार लोखंडे यांच्यासाठी शिंदे गटालाही शिर्डी हवी आहे. महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा मतदारसंघ आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या दृष्टीने हा मतदारसंघ महत्त्वाचा ठरला आहे.

edited by sachin fulpagare

Uddhav Thackeray
Shirdi News: शिर्डीतील काँग्रेसचे शहराध्यक्ष अन् नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; बाळासाहेब थोरात आक्रमक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com