Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राहाता येथील सभेत भाजपचे सुजय विखे यांना भर सभेत सल्ला दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुजय विखेंना सल्ला देताना टाकलेले कटाक्ष देखील चर्चेत आला आहे.
"सुजय नाराज आहे का? आपण लढणारे आहोत, रडणारे नाहीत. विरोधकांना असुरी आनंद घेऊ द्या. सुजय उद्याचा दिवस आपलाच आहे. प्रत्येक निवडणुकीतून शिकलं पाहिजे", असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सुजय विखेंना सल्ला दिला.
नाशिक शिक्षक विधान परिषद मदाररसंघाच्या महायुतीच्या उमेदवारासाठी राहाता येथे सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या सभेत चौफेर फटकेबाजी केली. लोकसभेत महाविकास आघाडीचा अपप्रचार रोखण्यात अपयश आल्याची कबुली देखील दिली. यातून काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. राजकारणाचा हा भाग आम्ही शिकून पुढे जात आहोत. विधानसभा निवडणुकीला कोठेही कमी पडणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
महायुतीच्या उमेदवारासाठी झालेली ही सभा भाजप (BJP) नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली झाली. प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. राजेंद्र विखे, आमदार आशुतोष काळे, मोनिका राजळे, राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि सुजय विखे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सुजय विखे यांना सल्ला दिला. हा सल्ला देताना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे टाकलेला कटाक्ष चर्चेत आला आहे. "सुजय नाराज आहे का? नाराज नको होवू. आपण लढणारे आहोत. रडणारे नाही. विरोधकांना असुरी आनंद घेऊ द्या. सुजय उद्याचा दिवस आपला आहे. प्रत्येक निवडणुकीतून शिकलं पाहिजे", असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुजय विखे यांना दिला.
शिक्षकांना दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. जुनी पेन्शन मंजूर केली आहे. शब्द पाळला आहे. शाळांना अनुदान, सातवा वेतन, आश्रमशाळा वेळ बदलण्याची जी मागणी करण्यात आली होती, त्यावर देखील सरकार कार्यवाही करणार आहे. शाळाबाह्य कामांबाबत देखील सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.