OBC Jan Morcha News : ओबीसी दुखविण्याचे काम सरकार करणार नाही. कारण त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणीही सत्तेत येवू शकत नाही. आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याची हिंमत सरकारने करु नये. मराठा समाजाच्या आंदोलनाचा धसका घेवून जर सरकारने काही निर्णय केला तर 2024 च्या निवडणुकीत या सरकारला घरचा रस्ता दाखविण्याचा इशारा ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे.
सरकार म्हणतंय मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन (convention) बोलावणार आहे. मात्र जर त्यांना अधिवेशन बोलवायचे असेल तर त्यांनी एका समाजासाठी का बोलवत आहे. मराठा समाजाबरोबर इतर समाजाच्या आरक्षणाचेही विषय आहेत. मराठा समाजाचे आमदार जास्त आहेत म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र अधिवेशन घेणार आहे काय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मराठा समाजासह धनगर (Dhangar) , ओबीसी (OBC), बंजारा, ऊसतोड मजूर समाजाचेही अनेक प्रश्न आहेत, मग सर्वांसाठी अधिवेशन घेवून एकाचवेळी सर्वांचे विषय सोडवावे. ओबीसी समाजातील नेत्यांना फोडाफोडीचे प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका ओबीसी समाजाला मान्य नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमच्यावर अन्यायाची मालिका अशीच सुरु राहिली, तर राजकीय पर्याय उभा केल्याशिवाय शांत बसणार नाही. येत्या दि. 20 जानेवारी 2024 पासून आमच्या समाजाचे पदाधिकारी प्रत्येक ठिकाणी आंदोलन सुरु करतील. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत राज्यभर आमची ही आंदोलने सुरु राहतील असा इशारा संघटनेच्या माध्यमातून दिला आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.