Dada Bhuse News: शिंदे सरकारची कामं थेट लोकांच्या मनात पोहचतात : दादा भुसे

Shivsena : शिवसेनेचा (शिंदे गट) ५७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : शिवसेनेचा (शिंदे गट) ५७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात भगवेमय वातावरण तयार करण्यात आलं आहे. "यंदाचा वर्धापन दिन हा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित असेल. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील जनतेसाठी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत, विविध समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्याचे उद्दिष्ट आहे", असं पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.

मायको सर्कल येथील शिवसेना (Shivsena) मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसेच तळागाळातील कार्यकर्ते, पदाधिकारी हीच शिंदे सरकारची ताकद असल्याचं पालकमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितलं.

Dada Bhuse
Manisha Kayande News : ...म्हणून मनीषा कायंदे शिंदे गटात जाताहेत; विनायक राऊतांनी सांगितले कारण

पुढं बोलताना पालकमंत्री भुसे म्हणाले, "मुख्यमंत्री शिंदे हे त्यांनी केलेल्या कामांमुळे ते राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री बनले आहेत. हे निर्णय घेणारे व लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणारे सरकार आहे. याआधीच्या सरकारने केलेली कामे कुणालाही दिसत नव्हती. आमची कामे थेट लोकांच्या मनात पोहोचतात. त्यामुळे सध्याच्या राज्य सरकारच्या सरकारी योजना लोकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन सुरू आहे", असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, यावेळी शहरातील विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, डॉक्टर्स, सामाजिक संस्था, संघटनांच्या शकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये सरला चव्हाण, सुषमा शिरसाट, अलका शिरसाट, मनीषा गोसावी, डॉ.जिनेंद्र शहा, डॉ.भगीरथ जाधव, डॉ.दीपक पाटील, डॉ.राहुल मिश्रा, डॉ.रोहित तिवारी, सुवर्ण जेतमल, कीर्ती ठाकूर, रेणुका ब्राह्मणे, दीपाली साठे, निर्मला ठाकूर, सुलताना शेख अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे अनिल बेग, सागर रभडिया, अनास खान यांनी प्रवेश केले.

Dada Bhuse
Subhash Desai News : 'आदित्य ठाकरेंचं नाव घेताच शिंदे-फडणवीसांचे चेहरे पडले'; सुभाष देसाईंनी काढला चिमटा !

वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक भगवे करण्यात आले आहेत. संपूर्ण महिना भगवा महिना म्हणून साजरा केला जाणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, क्रीडापटूंचा सत्कार, सरकारी योजनांची माहिती, ज्येष्ठ नागरिकांची वैद्यकीय तपासणी, शाखांचे उद्‌घाटन, आदी महत्त्वाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

यावेळी सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, संजय दुसाने, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, राजाभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख श्याम साबळे, शशिकांत कोठुळे, दिगंबर मोगरे, शिवाजी भोर, विधानसभा प्रमुख बाबूराव आढाव, प्रताप मेहरोलिया, रोशन शिंदे, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, मेघा साळवे, मंदाकिनी जाधव, वैशाली दाणी, उत्तम दोंदे, सचिन भोसले युवासेना विस्तारक योगेश बेलदार आदी उपस्थित होते.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com