Badamrao Pandit News: जो कोणी काम करणार नाही त्याला बुटाने मारुन हाकलणार : माजी मंत्री पंडितांचा व्हिडिओ व्हायरल

Gevrai News: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Badamrao Pandit
Badamrao Pandit Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : "जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे फळ पदरात येत नाही, तोपर्यंत कोणीही आराम करायचा नाही. आपल्या एकट्यावाचून काय राहतेय, हा करेल, तो करेल असे म्हणायचे नाही. सर्वांनी स्वत: काम करायचे, जो कोणी काम करणार नाही. त्याला आपल्या बंगल्यात बुटाने मारून हाकलून देणार", असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे.

गेवराईचे शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर पंडित यांना चांगलेच राजकीय बूस्टर मिळाल्याची चर्चा होती. शरद पवार यांच्या भेटीनंतर काही दिवसातच पंडित यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एकेकाळचे पंडित विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष असलेल्या गेवराई मतदारसंघात आगामी काळात नवी समीकरणे जुळून येण्याची शक्यता आहे.

Badamrao Pandit
Mungantiwar letter to Karnataka Govt. : शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारा ; मुनगंटीवारांनी कर्नाटक सरकारला खडसावले

बदामराव पंडित यांनी १९९४ साली चुलतबंधू शिवाजीराव पंडित यांना आव्हान दिले. बदामरावांना राज्यमंत्रिपदही भेटले. त्यानंतर पंडित विरुद्ध पंडित असे या मतदार संघाचे राजकीय समीकरण झाले. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा ॲड. लक्ष्मण पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर या मतदारसंघाचे समीकरण पुन्हा पंडित विरुद्ध पवार असे झाले. दरम्यान, बदामराव पंडित सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत.

अलीकडे आमदार लक्ष्मण पवार व माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यातच मतदारसंघातील राजकीय संघर्ष सुरू असताना राज्यातील नव्या राजकीय समीकरणात अमरसिंह पंडित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. तोच दुसरीकडे, शरद पवार यांनीही बदामराव पंडितांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यामुळे या भेटीची राजकीय चर्चा होत असतानाच बदामराव पंडित यांचा कार्यकर्त्याला बुटाने मारुन हाकलून देईल, असा व्हिडिओ समोर आला आहे.

Badamrao Pandit
Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकरांच्या सभेला नगर जिल्ह्यात अडथळे ? पोलिसांची अद्याप परवानगी नाही

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार बाळासाहेब आजबे यांनी पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्यांना चपलेले मारा, असा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, सदर मुद्दा हा शेतकरी व सामान्यांशी संबंधित असल्याने आजबेंचे कौतुक झाले. मात्र, आपण विधानसभा जिंकण्यासाठी काम न करणाऱ्या कार्यर्त्याला बुटाने मारण्याच्या भाषेमुळे पंडित यांच्यावर टीका होत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com