

Tukaram Mundhe news : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभर धडक कारवाया सुरु आहे. आयुक्त मुंढे यांनी आपला मोर्चा आता खाद्य तेलाकडे वळवला आहे. सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका असे आदेश मुंडे यांनी दिले आहेत. मात्र, या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक झाले आहेत.
मुंढेंच्या या निर्णयाला काही व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. नाशिकमध्ये तुकाराम मुंढेच्या सुट्टे खाद्यतेल विक्री बंदी निर्णयाच्या विरोधात राज्यातील खाद्यतेल व्यापाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईच्या विरोधात अनेक व्यापारी एकवटल्याने राज्यभर त्याची चर्चा सुरु झाली आहे. तुकाराम मुंडे यांच्या सुट्टे खाद्यतेल विक्रीबंदीच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी एकजुटीने आवाज उठवला आहे.
बैठकीत, हा निर्णय लहान व्यावसायिकांना आर्थिक संकटात ढकलणारा असल्याचा सूर व्यापाऱ्यांनी आवळला. वेळ पडली तर तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या आणखी एका कारवाईला चॅलेंज देण्यात आलं आहे.
व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. पुढच्या 15 दिवसांत निर्णय मागे न घेतल्यास राज्यातील सर्व खाद्यतेल व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा बैठकीतून देण्यात आला. केवळ राज्य सरकारपुरते मर्यादित न राहता केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
आम्ही अतिरेकी आहोत का?
दहा लाख रुपये दंड आणि कारावासाची शिक्षा अन्यायकारक असून आम्ही अतिरेकी आहोत का? असा संतप्त प्रश्न खाद्यतेल व्यापाऱ्यांनी उपस्थितीत केला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सुट्टे तेल विक्री हा अनेक वर्षांपासून चालत आलेला व्यवसाय असून, त्यावर अचानक बंदी घातल्याने हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडतील.
नाशिकमध्ये झालेल्या या बैठकीला राज्यातील विविध जिल्ह्यांतील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सुट्टे तेलावर बंदी घातल्यास पॅक्ड ऑइलची किंमत वाढेल त्याचा फटका सर्व सामान्य ग्राहकांना बसेल. शिवाय ग्राहकांनाही सुट्टे तेल स्वस्त दरात उपलब्ध होते. त्यामुळे सरकारने व्यापारी आणि ग्राहक दोघांच्या हिताचा विचार करून निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.