Shalarth ID Scam : बनावट शालार्थ ID घोटाळ्यातील फरार संशयिताचा जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज : सूचक दिलीप पाटील SIT च्या रडारवर!

Jalgaon Bank Election : जळगाव जिल्ह्यातील बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात विनोद तराळ हे संशयित आहेत. ते अंतुर्ली येथील तराळ विद्यालयाचे संस्थाचालक आहेत. या प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर एसआयटीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
Shalarth ID Scam
Shalarth ID ScamSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon News, 08 Nov : बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात फरार असलेले संशयित विनोद तराळ यांच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जामुळे नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी करणारे दिलीप पाटील यांची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात विनोद तराळ हे संशयित आहेत. ते अंतुर्ली येथील तराळ विद्यालयाचे संस्थाचालक आहेत. या प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर एसआयटीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

अशा परिस्थितीत विनोद तराळ यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासाठी दिलीप पाटील यांनी सूचक म्हणून भूमिका बजावली होती.

Shalarth ID Scam
Congress new : मतचोरीनंतर आता कार्यालयावरही डल्ला! काँग्रेसचा शिंदेंच्या शिवसेनेवर धक्कादायक आरोप

एकीकडे एसआयटीकडून विनोद तराळ यांचा शोध सुरू असताना दुसरीकडे त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यावेळी राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.आता या उमेदवारी अर्जाच्या अनुषंगाने एसआयटीने दिलीप पाटील यांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

Shalarth ID Scam
Nashik TCS Case : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यापर्यंत तपासाची धग; पोलिसांनी गुप्तपणे चौकशी करून नोंदविला जबाब

फरार संशयिताच्या उमेदवारी अर्जासाठी सूचक म्हणून भूमिका बजावण्यामागील नेमकी पार्श्वभूमी काय होती, याबाबत या चौकशीतून माहिती घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे विनोद तराळ यांच्या उमेदवारी अर्जावरून आता या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.